Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,200 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,27,571 वर
Coronavirus (Photo Credits: PTI)

आज मुंबई (Mumbai) मध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांनी पुन्हा हजाराचा टप्पा ओलांडला. आज शहरात कोरोनाच्या 1200 रुग्णांची व 48 मृत्यूंची नोंद झाली. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,27,571 वर पोहोचली. आज मुंबईमध्ये 884 रुग्ण बरे बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,00,954 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 19,332 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहे. आजच्या 48 मृत्युंसह मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या एकूण 6,988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या पैकी 33 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 30 रुग्ण पुरुष व 18 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 35 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 9 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झाला आहे. 6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.80 टक्के होता. 12 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 6,29,899 इतक्या आहेत, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 87 दिवस झाला आहे. (हेही वाचा: मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2649 वर पोहचला, महापालिकेची माहिती)

एएनआय ट्वीट -

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव समजून घेण्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी मुंबई महापालिकेकडून सेरो सर्वेक्षण केले जात आहे. आज पासून या सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज 11,813 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 5,60,126 अशी झाली आहे. आज नवीन 9,115 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 3,90,958 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,49,798 सक्रीय रुग्ण आहेत.