Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज 11 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 413 जणांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज 11 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 413 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 9 हजार 115 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 5 लाख 60 हजार 126 इतकी झाली आहे.

सध्या राज्यात 1 लाख 49 हजार 798 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3 लाख 90 हजार 958 रुग्णांची कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे 19 हजार 63 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - मुंबईत आज कोरोनाचे आणखी 1200 रुग्ण आढळून आले असून 48 जणांचा बळी, शहरातील COVID19 चा आकडा 1,27,571 वर पोहचला; 13 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

दरम्यान, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 69.8 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचा दर 3.4 टक्के इतका आहे. आज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 10 लाखाहून अधिक जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, औरंगाबाद आदी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

याशिवाय देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 23 लाखाचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत देशात 66 हजार हून अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर 56,383 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.