
सरकारी काम आणि सहा महिने थांब .. हा अनुभव अनेकांना अनेक ठिकाणी आला असेल. आजकाल बजेटमध्ये अनेक परदेश दौरे सहज उपलब्ध असतात. त्यामुळे पासपोर्ट काढण्याचं प्रमाण वाढलं आहे. शहरात काही ठराविक ठिकाणीच पासपोर्ट सेवा केंद्र उपलब्ध असल्याने अनेकांची गैरसोय होत होती. मात्र आता ही समस्या दूर करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी योजना सुरू केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून नवी सेवा केंद्र
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जानेवारी 2017 देशभरात 289 पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमांतर्गत 218 केंद्र सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात 11 नवी पासपोर्ट केंद्र
महाराष्ट्रात सध्या 25 पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. यामध्ये आता 11 नव्या पासपोर्ट केंद्राची भर पडणार आहे. 'पासपोर्ट आपल्या दारी' या योजनेच्या चौथ्या टप्प्यांतर्गत 11 नवी पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्या केंद्राची भर पडल्यानंतर आता महाराष्ट्रभरातील एकूण संख्या 36 झाली आहे.
कुठे सुरू होणार नवी पासपोर्ट केंद्र ?
भंडारा, भिवंडी, बुलडाणा, धुळे, गडचिरोली, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी, रायगड, रामटेक, रावेर या शहरात नवी पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहेत.