Coronavirus: मुंबईमध्ये (Mumbai) आज 100 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर तसेच मुंबई उपनगरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 590 वर पोहचली आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने (Brihanmumbai Municipal Corporation, Public Health Department) माहिती दिली आहे.
राज्यात मुंबईमध्ये कोरोना रुग्णांत सर्वाधिक वाढ होत आहे. मुंबई शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईतील धारावी, वरळी, दादर, अंधेरी, मालाड या भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. (हेही वाचा - Covid-19: स्वत:हून समोर न आल्यास कठोर कारवाई केली जाणार; मरकज येथून महाराष्ट्रात परतलेल्या लोकांना राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सूचक इशारा)
100 new #COVID19 cases and 5 deaths have been reported in Mumbai today. Death toll rises to 40. Total number of positive cases in Mumbai stand at 590: Public Health Department, Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) April 7, 2020
दरम्यान, आज देशात गेल्या 24 तासांत 508 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारतातील कोरोना बाधितांची संख्या 4789 झाली आहे. यातील 4312 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 353 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात कोरोनामुळे 124 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.