Coronavirus Cases In Dharavi: धारावीत (Dharavi) आज 10 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 2199 वर पोहोचली आहे. यातील 1018 रुग्णांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 1100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, 81 जणांची कोरोना विषाणू विरोधातील झुंज अपयशस्वी ठरली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकाने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, जून महिन्यात धारावीत कोरोनाचा संसर्ग कमी झालेला पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात धारावीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मंगळवारी धारावीत 5 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, आज धारावीतील 10 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 48 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 185 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण तर 2 जणांचा मृत्यू)
10 new COVID-19 positive cases reported in Dharavi area of Mumbai, taking the total number of cases in the area to 2199 including 1018 active patients, 1100 recovered/discharged and 81 deaths: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) June 24, 2020
धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. धारावीत घरांची रचना दाट असून त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. मुंबईतील धारावी, वरळी, दादर, कोळीवाडा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मंगळवारी मुंबईत 846 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 42 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 68 हजार 481 इतकी झाली आहे. यापैकी 3 हजार 842 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 34 हजार 576 जणांनी कोरोनावर मात केली आहे.