Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus Cases In Pune: पुणे शहरात आज नव्याने 1 हजार 91 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 70 हजार 326 इतकी झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 335 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 3 लाख 42 हजार 589 इतकी झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 14 हजार 712 रुग्णांपैकी 737 रुग्ण गंभीर असून यातील 448 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 289 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. शहरात आणखी 35 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले असून यात DMH 9, ससून 8, बुधराणी 3, भारती 2, रुबी, देवयानी, सना, श्री, सह्याद्री, लाइफ केअर, नायडू, जहांगीर, नवले, ग्लोबल, Pune Adventist, O&P आणि D.H.AUNDH प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. (हेही वाचा - Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज 11 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 413 जणांचा मृत्यू)

दरम्यान, आज राज्यात 11 हजार 813 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 413 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 9 हजार 115 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 5 लाख 60 हजार 126 इतकी झाली आहे.