पुणे शहरात आज दिवसभरात 1 हजार 308 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Coronavirus in India | (Photo Credits: PTI)

पुणे (Pune) शहरात आज नव्याने 1 हजार 308 नव्या कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 51 हजार 738 इतकी झाली आहे. शहरात आज दिवसभरात 5 हजार 919 नमुने घेण्यात आले. त्यामुळे शहराची एकूण टेस्टची संख्या आता 2 लाख 61 हजार इतकी झाली आहे. यांसदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आज शहरातील 2543 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून डिस्चार्ज संख्येची ही एका दिवसातील विक्रमी संख्या आहे. आतापर्यंत पुणे शहरातील 32 हजार 623 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. (हेही वाचा - Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,118 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,11,964 वर)

दरम्यान, आज महाराष्ट्रात दिवसभरात 9,211 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 298 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 4,00,651 इतकी झाली आहे. आतापर्यंत 2,39,755 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 1,46,129 जणांवर रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. तसेच राज्यात आतापर्यतं 14,463 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.