मुंबईमध्ये (Mumbai) आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 1,118 रुग्णांची व 60 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह शहरातील एकूण कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या 1,11,964 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 916 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत मुंबईमध्ये एकूण 8,5327 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 6,244 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 20,123 सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज मुंबईमध्ये 867 कोरोनाच्या संशयित रुग्णांची भर्ती करण्यात आली. बीएमसीने (BMC) ने याबाबत माहिती दिली.
आज मृत्यू झालेल्या 42 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यातील 43 रुग्ण पुरुष व 17 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 48 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 10 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 76 टक्के राहिला आहे. 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.97 टक्के होता. 28 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 5,05,982 इतक्या आहेत.
(हेही वाचा: महाराष्ट्रात आज दिवसभरात 9,211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 298 जणांचा मृत्यू)
पीटीआय ट्वीट -
Mumbai's coronavirus case tally rises to 1,11,964 with addition of 1,118 new cases; 60 deaths take toll to 6,244: civic body
— Press Trust of India (@PTI_News) July 29, 2020
मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 72 दिवस झाला आहे. सध्या मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 6222 आहे व सक्रिय सीलबंद इमारती या 5960 आहेत. दरम्यान, मुंबईत कोविड चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. काल, 28 जुलै 2020 रोजी एका दिवसात उच्चांकी अशा 11,643 चाचण्या पार पडल्या. मुंबईमध्ये रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यापेक्षा कमी झाला आहे.