महाराष्ट्रात आज दिवसभरात 9,211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 298 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या 4,00,651 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झालेल्या 2,39,755 जणांचा, प्रत्यक्ष रुग्णालायत उपचार सुरु असलेल्या 1,46,129 रुग्णांचा आणि आजवर कोरोनामुळ मृत्यू झालेलया 14,463 रुग्णसंख्येचाही समावेश आहे. राज्यातील कोरोना व्हायरस रुग्णांचा बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 59.84% इतके आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department) दिली.
मुंबई शहरातील अत्यंत दाटीवाटीचा परिसर अशी ओळख असलेल्या धारावी येथूनही दिलासादायक वृत्त आहे. धारावी परिसरातील कोरोना व्हायरस संक्रमितांचे प्रमाण अत्यंत वेगाने घटताना दिसते आहे. धारावीतील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 2,545 इतकी झाली आहे. यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 83 रुग्णांचाही समावेश आहे. तसेच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचाही. उल्लेखनीय असे की, आज दिवसभरात धारावी परिसरात केवळ 2 नव्या कोरोना व्हायस संक्रमित रुग्णांची नोंद झाली.
संपूर्ण मुंबई शहरातूनही आनंददायी वृत्त आहे. शहरातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या दुप्पटीचा वेग (Doubling Rate) आता 72 दिवसांवर पोहोचला आहे. तर संसर्गाच्या वाढीचा दर (Rate Of Infection Growth) हा 0.9 इतका म्हणजेच 1 टक्क्याच्याही खाली गेला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचे उपचारानंतर बरे होण्याचे आणि रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळण्याचे प्रमाणही 76 टक्क्यांवर पोहोचले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली. (हेही वाचा, Good News For Mumbaikar: मुंबईतील कोरोना व्हायरस रुग्णांच्या दुप्पटीचा दर 72 दिवसांवर पोहोचला, आज दिवसभरात 1104 जण संक्रमित)
298 deaths and 9,211 new #COVID19 cases reported in the state today. The total number of positive cases is now 4,00,651 including 2,39,755 recovered cases, 1,46,129 active cases and 14,463 deaths. Recovery rate in the state is at 59.84%: Maharashtra Health Department pic.twitter.com/rnGWCkIXaA
— ANI (@ANI) July 29, 2020
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कोरोना व्हायरस रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज दिवसभरात 11643 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंतच्या चाचण्यांपौकी सर्वोच्च आकडा आहे. मुंबई आज दिवसभरात कोरना व्हायरस संक्रमित 1104 रुग्ण सापडले. आजची शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Positivity) 9.48 इतकी आढळली. पधरवड्यापूर्वी ती 24 टक्के इतकी होती. दरम्यान, शहरामध्ये आजघडीला 7178 इतके बेड रिक्त आहेत. तर 204 इतके अतिदक्षता विभाग रिक्त आहेत.