Pune Coronavirus Cases: मुंबई पाठोपाठ पुणे शहरातदेखील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरात आज 1 हजार 290 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्या आली. तर 1 हजार 961 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिलासादायक बाब म्हणजे आज शहरातील 1 हजार 961 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
पुणे शहरात आज नव्याने 1290 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 64 हजार 576 इतकी झाली आहे. तसचे एकाच दिवसात 1961 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत शहरातील 46 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Mumbai: मुंबईत आज 1 हजार 304 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 58 जणांचा मृत्यू; शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजार 331 वर पोहोचली)
एकाच दिवसात १,९६१ रुग्णांना डिस्चार्ज; एकूण संख्येने ४६ हजारांचा टप्पा ओलांडला
शहरातील १,९६१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४६ हजार ७३५ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !#PuneFightsCorona pic.twitter.com/Wrhwd1EHku
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 8, 2020
दरम्यान, आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत. दुर्देवाची बाब म्हणजे 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान पुण्यातील 37 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यात ससून 14, DMH 5, नायडू 5, नवले 4, पूना 2, इनामदार 1, लाइफ केअर 1, दळवी 1, संचेती 1, नोबेल 1, भारती 1 आणि Pune Adventist 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरातील 1516 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
याशिवाय पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 51 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 3 लाख 13 हजार 580 इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या 16 हजार 325 रुग्णांपैकी 717 रुग्ण गंभीर असून यातील 443 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यातील 274 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.