Gold Chain Snatching At Dagdusheth Ganpati Temple | X Pune Mirror and Dagdusheth Ganpati Temple

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर (Dagdusheth Ganpati Temple) दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाची 40 हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरल्याच्या आरोपाखाली शनिवारी दोन महिलांना अटक करण्यात आली.सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) वरून ही कारवाई करण्यात आली आहे. दर्शन रांगेत आणि ऐन गर्दीच्या ठिकाणी त्यांनी ही चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, अटक केलेल्या महिलांची नावं माधुरी संतोष दुखले (23 वर्ष) आणि काव्या तन्वीर जाधव (21 वर्ष) अशी आहेत. त्यांची ओळख पटली आहे. दोघीही यवत येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांगेत गर्दीचा फायदा घेत त्यांनी इंदापूर येथील सोनाली सुहास बोराटे (26 वर्ष) हिला लक्ष्य केले आणि तिच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेतली. नक्की वाचा: Bengaluru Chain Snatching outside Temple: बेंगलूरू मध्ये मंदिराबाहेर खिडकीतून लांबवली महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी (Watch Video). 

बाहेर दर्शन रांगेत चोरी

पुण्यातील या चोरीच्या घटनेनंतर, गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही महिलांना तातडीने अटक करण्यात आली आणि कॉन्स्टेबल केट सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दोघांचा परिसरातील इतर अशाच घटनांशी संबंध आहे का याचाही आढावा देखील पोलिसांकडून घेतला जात आहे.