Yes Bank (Photo Credits: File Photo)

येस बँकचे संस्थापक राणा कपूर (Rana Kapoor) यांना आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यानंतर आता राणा कपूर यांची मुलगी रोशनी हिला मुंबई विमानतळावर अडवण्यात आले आहे. रोशनी ही ब्रिटिश एअरवेजने मुंबईतून लंडन येथे जाण्यासाठी निघाली होती. तर ईडीने शुक्रवारी राणा कपूर यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर तब्बल 31 तास त्यांची कसून चौकशी केली. तसेच राणा कपूर यांना 11 मार्च पर्यंत ईडी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. हा निर्णय मुंबईच्या विशेष पीएमएल कोर्टाने सुनावला आहे.

येस बँक प्रकरणी राणा कपूर यांच्यासह पत्नी आणि तीन मुलींच्या विरोधात ईडीकडून लुकआउट नोटीस जाहीर केली आहे. याच कारणामुळे राणा परिवारातील कोणत्याही सदस्याला भारत सोडून जाण्याची परवानगी नाही आहे. दुसऱ्या बाजूला रविवारी संध्याकाळी केंद्रीय तपास ऐजंसी CBI यांनी राणा कपूर आणि DHFL चे प्रमोटर्स कपिल वाधवानी यांच्या विरोधात अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.(Yes Bank Crisis: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची 11 मार्च पर्यंत ED च्या तुरुंगात रवानगी, पीएमएल कोर्टाने सुनावला निर्णय)

राणा कपूर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आले आहे.दरम्यान, कपूर यांनी आरबीआयने केलेल्या या कारवाईबाबत कोणतेच स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे. त्यांनी शुक्रवारी काही मीडियांसोबत फोनवरुन बातचीत करताना असे म्हटले आहे की,गेल्या 14 महिन्यांपासून मी बँकेच्या कोणत्याच कामात सहभागी नाही आहे. अशातच कोणत्याही बदलावाबाबत सुद्धा माहिती नसल्याचे राणा यांनी सांगितले आहे.

तर बँकेला वाचवण्यासाठी गुरुवारी एसबीआयचे माजी सीएफओ प्रशांत कुमार यांची अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येस बँकेचे भविष्य केंद्र सरकार, आरबीआय आणि एसबीआयच्या हाती आहे. गुरुवारी रात्री आरबीआयने बँकेच्या सर्व सर्विसवर बंदी घातली. त्यानंतर सर्व ऑनलाईन सर्विस सुद्धा बंद केले. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार अचनाक ठप्प झाल्याने बँकेच्या बाहेर खातेधारकांनी गर्दी केली होती. मात्र आता तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. सध्या ग्राहकांना एका महिन्यात फक्त 50 हजार रुपये काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.