Yes Bank Crisis: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची 11 मार्च पर्यंत ED च्या तुरुंगात रवानगी, पीएमएल कोर्टाने सुनावला निर्णय
येस बँकेचे (Yes Bank) संस्थापक राणा कपूर (Rana Kapoor) यांना आज (8 मार्च) सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर राणा यांना ईडीने (ED) विशेष पीएमएल कोर्टत सादर केले. तर कोर्टाने निर्णय देत त्यांना 11 मार्च पर्यंत ईडीच्या तुरुंगात पाठवणी केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
येस बँकेचे (Yes Bank) संस्थापक राणा कपूर (Rana Kapoor) यांना आज (8 मार्च) सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर राणा यांना ईडीने (ED) विशेष पीएमएल कोर्टत सादर केले. तर कोर्टाने निर्णय देत त्यांना 11 मार्च पर्यंत ईडीच्या तुरुंगात पाठवणी केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 31 तास राणा यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. राणा यांना कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकिय चाचणी करण्यात आली. राणा कपूर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आले आहे.दरम्यान, कपूर यांनी आरबीआयने केलेल्या या कारवाईबाबत कोणतेच स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे. त्यांनी शुक्रवारी काही मीडियांसोबत फोनवरुन बातचीत करताना असे म्हटले आहे की,गेल्या 14 महिन्यांपासून मी बँकेच्या कोणत्याच कामात सहभागी नाही आहे. अशातच कोणत्याही बदलावाबाबत सुद्धा माहिती नसल्याचे राणा यांनी सांगितले आहे. (Yes Bank Crisis: येस बॅंकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा! आता एटीम मधून पैसे काढता येणार असल्याची दिली माहिती)
तर बँकेला वाचवण्यासाठी गुरुवारी एसबीआयचे माजी सीएफओ प्रशांत कुमार यांची अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येस बँकेचे भविष्य केंद्र सरकार, आरबीआय आणि एसबीआयच्या हाती आहे. तर येस बँकेचे शेअर्स एसबीआय खरेदी करणार आहे. सध्या असे सांगितले जात आहे की, एसबीआयची यामध्ये 49 टक्के भागीदारी असणार आहे. तर बँकेची स्थिती सुधारल्यास ही भागीदारी 26 टक्के करण्यात येणार आहे. खातेधारकांचे पैसे सुरक्षित असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. तसेच एका महिन्यात बँकेची स्थिती सुधारेल असा विश्वास सुद्धा दर्शवला आहे.
बँकेच्या खातेधारकांना त्यांच्या डेबिट कार्डचा वापर करुन अन्य बँकांच्या एटीएम मधून पैसे काढता येणार आहे. गुरुवारी रात्री आरबीआयने बँकेच्या सर्व सर्विसवर बंदी घातली. त्यानंतर सर्व ऑनलाईन सर्विस सुद्धा बंद केले. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार अचनाक ठप्प झाल्याने बँकेच्या बाहेर खातेधारकांनी गर्दी केली होती. मात्र आता तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. सध्या ग्राहकांना एका महिन्यात फक्त 50 हजार रुपये काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2020 02:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

