नात्याच्या विचार करण्याआधी जाणून घ्या मुलींचे हे कॉमन नखरे
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

आजकाल मुलींना डेट करणे पहिल्यासारखे सोपे राहिले नाही. मुलींच्या गरजा आणि स्वभाव काळानुसार इतका बदलला आहे की, त्यांना सांभाळून घेणे हे आजकालच्या मुलांच्या नाकीनऊ आले आहे. त्यात आजकालच्या मुलींचे नखरे तर तोबा तोबा. गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी त्याचे हरएक नखरे सहन करणारे वीरही पाहायला मिळतात. मात्र प्रत्येकालाच हे जमते असे नाही. त्यामुळे तुम्हीदेखील कोणत्या मुलीला डेट करण्याचा विचार करत असाल तर मुलींचे हे कॉमन नखरे तुम्हाला माहित असायलाच हवेत.

तुझे माझ्यावर प्रेमच नाही – मुली प्रत्येकवेळीच आपल्या बॉयफ्रेंडकडून प्रेमाची डिमांड करत असतात. तुझे माझ्यावर प्रेम नाही त्यामुळेच तू माझ्या इच्छा पूर्ण करत नाहीस, हे मुलींचे कॉमन वाक्य असते. त्यामुळे नात्यामध्ये मुलींच्यासमोर नेहमी तुमचे प्रेम व्यक्त करत जा.

मला शॉपिंगला घेऊन जात नाही – गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडकडे करत असणारी ही अजून एक तक्रार. सर्वांनाच माहित आहे की मुलींना शॉपिंगची किती आवड असते, त्यामुळे मुली आपल्या बॉयफ्रेंडकडे नेहमीच शॉपिंगची जिद करत असतात.

फिल्म पाहायला घेऊन जात नाही – मुलींना बाहेर फिरायला जाणे, फिल्म पाहणे हे फार आवडते. त्यामुळे चित्रपटाला घेऊन जा म्हणून त्या नेहमीच आपल्या बॉयफ्रेंडमागे भुंगा लावत असतात.

लांब लांब का राहतो – सार्वजनिक ठिकाणीही मुलींना आपल्या बॉयफ्रेंडला चिटकून राहायला आवडते. त्यामुळे एकत्र चालताना तुम्ही थोडे जरी अंतर ठेऊन चालू लागलात की, मुलींना ते खटकते.

बाहेर खायला जाऊया – मुलींना कारण असो वा नसो नेहमीच बाहेर काहीतरी खायला आवडते. त्यामुळे आपल्या बॉयफ्रेंडने न विचारता आपल्याला एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये डिनर अथवा लंचला घेऊन जावे अशी गर्लफ्रेंडची इच्छा असते.

मित्राशी बॉयफ्रेंडची तुलना करणे – बॉयफ्रेंडसोबत प्रत्येक मुलीच्या आयुष्यात दुसरा एखादा चांगला मित्रदेखील असतो. छोट्या गोष्टीवरून देखील मुली नाराज झाल्या अथवा काही खटकले की त्या लगेच आपल्या बॉयफ्रेंडची तुलना आपल्या मित्राशी करू लागतात.

पार्टीला जाऊया – पार्टी करणे, पैसे उडवणे हे मुलींना हाय स्टँँडर्ड वाटते. त्यातल्या त्यात मुलींना लेट नाईट पार्टीज आवडतात मात्र प्रत्येक मुलगी ते बोलून दाखवत नाही. त्यामुळे तुम्ही जर गर्लफ्रेंड बनवण्याच्या तयारीत असाल तर पार्टीला जाण्याची तयारी ठेवा.

संशय घेणे – संशय घेणे हा मुलींचा मूळ स्वभाव असतो. भेटायला थोडा जरी उशीर झाला, फोन उचलला नाही, मेसेजला उत्तर दिले नाही तर कारण जाणून घेण्याआधी मुली सर्वप्रथम संशय घ्यायला सुरुवात करतात. त्यामुळे एखाद्या मुलीसोबत नाते जोडण्याआधी त्यांच्यासाठी नेहमी स्वतःला उपलब्ध करून ठेवण्यास शिका.