आषाढीची वारी झाली की सार्यांनाच वेध लागतात ते श्रावण महिन्याचे! श्रावण महिना (Shravan Month) आला की त्याच्यासोबत उत्साह, चैतन्य येतोच कारण वातावरणात जसा ऊन पावसाचा खेळ सुरू असतो तसाच या महिन्यात येणार्या सण, समारंभांनी, व्रत-वैकल्यांनी भरलेल्या या महिन्यात प्रत्येक दिवस खास असतो. यंदा 18 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. या मंगलमय पर्वाची सुरूवात तुमच्या प्रियजणांना सोशल मीडीयात मराठमोळे संदेश, Wishes, Images, Quotes, Wallpapers, Greetings शेअर करत करू शकता. त्यासाठी तुम्ही लेटेस्टली मराठीकडून तयार करण्यात आलेली ही HD इमेजेस डाऊनलोड करू शकता.
यंदा महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याची सुरूवात मंगळवार 18 जुलैपासून सुरु होत आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिन्यांपैकी आहे. त्यामुळे या महिन्याचं एक विलक्षण कौतुक देखील आहे. (हे देखील वाचा: Mangala Gauri 2023 Messages: मंगळागौरी व्रत निमित्त Greetings, Images, Wishes, SMS द्वारे द्या खास शुभेच्छा!)
निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!
सणासुदीची घेऊन उधळण
आला रे आला हसरा श्रावण!
श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण!
संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या
आला तो श्रावण पुन्हा आला…श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
परंपरेचे करूया जतन
आला आहे श्रावण – श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्रावण महिन्यात नागपंचमी हा पहिला सण साजरा केला जातो. त्याच्या पाठोपाठ रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, बैलपोळा हे सण साजरे केले जातात. यांच्या जोडीला अनेक व्रत-वैकल्यं असतात. काही घरात या पवित्र महिन्यात घरात सुख शांती नांदावी म्हणून पूजा आयोजित केली जाते. महिला वर्गाला साजश्रृंगार करून या महिन्यात आपली हौस मौज पूर्ण करण्यासाठी अनेक संधी असतात.