international Panic Day PC PIXABAY

International Panic Day 2024: आज 18 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पॅनिक डे (International Panic Day) साजरा केला जातो. मानसिक आरोग्याची जागरुकता आणि आरोग्याची काळजी घ्यावी या करिता हा दिवस साजरा केला जातो. पॅनिक अॅटक म्हणजे सर्वसाधाराण अचानक व्यक्तीच्या मनात भीतीची (Anxiety) लहर येते. ज्यामुळे पीडित व्यक्ती अस्वस्थ होतो त्याला घबराट होऊ शकते. हा समस्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. कोणत्याही कारणाशिवाय किंवा धोक्याशिवाय पॅनिक अॅटक येऊ शकतो. पॅनिक अॅटॅकची काही सामान्य  लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. हेही वाचा- धूम्रपान आणि महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम; घ्या जाणून

  • ह्रदयाचे ठोके वाढणे किंवा धडधड होणे.
  • श्वास घ्यायला त्रास होणे, घाम येणे,
  • कंपने किंवा थरथर येणे
  • चक्कर येणे किंवा भोवळ येणे
  • गुदमरल्या सारखे वाटणे

शास्त्रांच्या अभ्यासानुसार,  पॅनिक अॅटक हे साधारण वयाच्या कोणत्याही वर्षी येऊ शकते. पॅनिक अॅटक १० ते २० मिनिटे टिकू शकतात. परंतु काही व्यक्तींमध्ये ते तासभर देखील टिकू शकतात. पॅनिट अॅटकपासून दूर राहण्यासाठी खालील प्रमाणे काही टीप्स फॉलो करा

  • शांत राहण्याचा प्रयत्न करा: जर पॅनिक अॅटकशी त्रस्त असाल तर त्यावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. अश्या वेळी नकारात्मक गोष्टीचा विचार टाळा. हळूहळू  श्वास घ्या. ज्यामुळे ताण कमी होईल.
  • आवडीचे काम: अश्या वेळी तुम्ही आवडीचे काम करा जेणे करू तुमचा आत्मविश्वास वाढेल. पुस्तक वाचा, मनाला शांत करणारी संगित ऐका. बाहेर फिरण्यास जा.
  • व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.
  • थेरपिस्टची मदत घ्या: योग्य थेरपी आणि व्यावसायिक मदत मिळवणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

योगा शारिरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते त्यामुळे पॅनिक अॅटकसाठी एक प्रभावी उपाय असू शकतो. दररोजच्या जीवनात हे योगासने (Yoga) करा आणि पॅनिक अॅटकपासून आराम मिळवा.

  • बालासन (Childs pose)
  • शवासन (Corpse Pose)
  • कपालभारती (Skull Shining Breath)
  • ध्यान (Meditation)