वेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक
Vera Gedroits Google Doodle (Photo Credits-Google)

Vera Gedroits 151st Birth Anniversary: गुगल कडून आज रशियातील पहिल्या महिला सर्जन यांचा 151 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यासाठी गुगलने एक खास डुडल सुद्धा साकारले आहे. राजकुमारी वेरा गेदरॉयट्स यांची आज जयंती साजरी केली जात आहे. या रशियन डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि लेखर सुद्धा होत्या. तर रशियातील पहिल्याच त्या महिला सैन्य सर्जन होत्या. सर्जरी करणाऱ्या पहिला महिला प्रोफेसर आणि रशियातील इंम्पीरियल पॅलेसमध्ये एका डॉक्टरच्या रुपात सेवा देणाऱ्या त्या पहिल्याच होत्या.

एका तरुण चिकित्सक रुपात गेदरॉयट्स हायजीन, पोषण आणि स्वच्छते संदर्भात चिंतीत होत्या. तसेच स्थितींमध्ये सुधार घडवण्यासाठी काही सिफारीश सुद्धा केल्या होत्या. गेदरॉयट्स यांना पाच भावंडे होती. मारिया (1861), इग्नाटियस (1864), नादेज्दा (1876) आणि त्यांचा एक भाऊ सर्गेई हा विशेष रुपात गेदरॉयट्स यांना प्रिय होता. मात्र त्याचा तरुणवयातच मृत्यू झाला.(Google Doodle COVID-19 Prevention: कोरोनाव्हायरस प्रतिबंध- ‘मास्कचे महत्त्व कमी झाले नाही, मास्क वापरा जीव वाचवा’, गूगल डूडल साकारत महत्त्वपूर्ण संदेश

Vera Gedroits Google Doodle (Photo Credits-Google)

सर्गेई याच्या मृत्यूनंतर गेदरॉयट्स यांनी डॉक्टर बनण्याचे ठरविले. त्यामुळे दुख रोखून धरण्यास मदत होईल या विचाराने त्यांनी तो निर्णय घेतला. मुलांना त्यांच्या आईप्रमाणे ऑर्थोडॉक्सच्या रुपात संभाळले गेले. परंतु त्यांचे वडील कॅथोलिक होते. तर गॅदरॉयट्स यांचा 1932 मध्ये 56 व्या वर्षी कीव येथे निधन झाले.