कोकण मार्गावर धावणार्‍या Tejas Express देखील Vistadome Coach सह धावणार; पहा नोव्हेंबर महिन्यापासून या ट्रेन मध्ये होणारे बदल
Tejas Express (Photo Credits: ANI)

कोकणचं सौंदर्य न्याहाळण्यासाठी आता जनशताब्दी पाठोपाठ मुंबई-करमाळी तेजस एक्सप्रेसलाही (Mumbai CSMT–Karmali Tejas Express) विस्टाडोम कोच (Vistadome Coach) जोडण्यात येणार आहे. कोकणात जाणारे प्रवासी आता 15 सप्टेंबर पासून तेजस एक्सप्रेस मध्ये विस्टाडोम कोचने देखील प्रवास करू शकणार आहेत. 14 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून त्यासाठीचं आरक्षण सुरू होणार आहे. विस्टाडोममध्ये एका डब्यात 40 प्रवासी असणार आहेत.

विस्टाडोम हा प्रशस्त आणि खास डब्बा असतो. वातानुकुलित असणार्‍या या डब्यामध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. काचेच्या प्रशस्त खिडक्या आणि छत आहे ज्यामुळे डोंगरदर्‍यांचे विहंगम दृश्य टिपता येते.

कोकणात धावणार्‍या तेजस एक्सप्रेस मध्ये बदल

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्सप्रेस आता 1 नोव्हेंबर 2022 पासून करमाळी ऐवजी मडगाव पर्यंत धावणार आहे. तर ही ट्रेन दर मंगळावार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. मडगावहून मुंबईला देखील ही ट्रेन याच दिवशी परत येणार आहे. 15 सप्टेंबरपासून तेजस एक्सप्रेसला विस्टाडोम डब्बा असेल.

कोकणात यापूर्वी मुंबई- मडगाव मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस या ट्रेनला विस्टाडोम डब्बा जोडण्यात आला होता. आता कोकणात धावणारी विस्टाडोम सह तेजस ही दुसरी ट्रेन असणार आहे. यासोबतच मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आणि मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस या ट्रेनला देखील विस्टाडोम डब्बा आहे.