राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) समोर असलेले मुगल गार्डन (Mughal Garden) आजपासून (13 फेब्रुवारी) सामान्य नागरिकांसाठी खुले होणार आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे या वेळी मुगल गार्डन येथे प्रवेश मिळविण्यासाठी ऑनलाईन बुकींग करावे लागणार आहे. जे लोक ऑनलाईन बुकींग (Mughal Gardens Booking) करतील त्याच लोकांना तिकीट मिळू शकणार आहे. तसेच ज्या लोकांना तिकीट मिलणार आहे त्या लोकांना राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवनातील संग्रहालय आणि चेंज ऑफ गार्ड समारंभही पाहायला मिळणार आहे.मुगल गार्डन 13 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत सर्वसामान्य लोकांसाठी खुले राहणार आहे. परंतू, या कालावधीतही हे गार्डन प्रत्येक सोमवारी बंद राहणार आहे. नॉर्थ एव्येन्हू रोडवर राष्ट्रपती भवनच्या गेट नंबर 35 मधून गार्डनमध्ये एण्ट्री मिळणार आहे.
कसे करा बुकींग?
मुगल गार्डनसाठी ऑनलाईन बुकींग करण्यासाठी https://presidentofindia.gov.in/ या संकेतस्थाळाला भेट द्या. त्यावर मुगल गार्डन या ऑप्शनवर क्लिक करा. हेच बुकींग आपण राष्ट्रपती सचिवालयाची वेबसाईट https://rashtrapatisachivalaya.gov.in वरही करु शकता. त्यासाठी दिलेल्या टूल लिंकला भेट द्या. एका बुकींगमध्ये जास्तीत जास्त पाच पर्यटकांना प्रवेश मिळू शकतो. एका मोबाईल वरुन केवळ एकाच बुकींगला मान्यता आहे. मुगल गार्डनसाठी सात दिवस आगोदर बुकींग कराता येणार आहे. (हेही वाचा, National Sports Awards 2019: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या पुरस्कारांचे वितरण; पहा संपूर्ण यादी)
सर्वसामान्य नागरिकांसाठी 7 टप्प्यांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एका एका तासाच्या अवधीसाठी सकाळी 10 ते सायकाळी 5 असे हे टप्पे असतील. पहिला टप्पा सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. शेवटचा प्रवेश दुपारी 4 वाजता दिला जाईल.
प्रत्येक टप्प्यात 10 पर्यटकांना प्रवेशास मुभा असेल. 10 वर्षांखालील आणि 65 वरषांवरील नागरिकांना गार्डनमध्ये प्रवेश नसेल. पर्यटकांना ओळखपत्राशिवाय प्रिंट अथवा डिजिटल फॉर्मेटमध्ये एण्ट्री विजिटर्स पास सोबत बाळगणे आवश्यक. गार्डनमध्ये प्रवेश केल्यानंतर परिसरात मोबाईल वापरण्यास मनाई असेल. गार्डनमध्ये प्रवेश केल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ करावा लागणार आहे.