सध्याची तरुण मंडळी गिर्यारोहणाला जाताना पाहायला दिसून येत आहेत. तसेच विविध ठिकाणचे सौंदर्य, त्या ठिकाणचा इतिहास या सर्व गोष्टी अनुभवण्यासाठी गिर्यारोहण पर्याय निवडत आहेत. त्यात उंच पर्वतरांगा यशस्वीपणे सर करणारी 36 वर्षीय 'बिकनी हायकर' (Bikni Hiker) गिगी (Gigi) ही सर्व गिर्यारोहण करणाऱ्यांच्या तुलनेत निराळीच होती. परंतु तैवान येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या गिगिचा 65 फूट उंचवारुन खाली पडून आणि कडाक्याच्या थंडीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गिगी ही सोशल मीडियावर बिकनी हायकर म्हणून प्रसिद्ध होती. कोणताही ऋतु असो ती पूर्ण कपडे परिधान करण्यापेक्षा बिकनी घालून पर्वत सर करायची. मात्र तैवान येथे ती गिर्यारोहणासाठी एकटीच गेली होती. त्यावेळी कड्यावरुन पडून कोसळून दरीत पडली. तरीही तिने सॅटेलाइट फोनद्वारे अपघाताची माहिती तिच्या मित्रमंडळींना दिली. त्यानंतर तिच्या शोधकार्यासाठी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले. मात्र शोधकपथकाला तिचा मृतदेह तब्बल 28 तासांनतर सापडला.
या प्रकरणी गिगी हिच्या जवळ कडाक्याची थंडी सहन करण्यासाठी उबदार कपडे नव्हते. त्यामुळेच थंडीत गोठून तिचा मृत्यू झाल्याचे बचाव पथकाने सांगितले आहे.