प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Gujarati Garba/Facebook)

घट बसले, देवीच्या मुर्त्या विराजमान झाल्या आणि मोठ्या धूमधडक्यात नवरात्रीला सुरुवात झाली. आख्या भारतात विविध नावाने आणि विविध प्रकारे हा देवीचा उत्सव साजरा केला जातो. मात्र या सर्वात एक गोष्ट समान असते ती म्हणजे सर्वांमधील उत्साह. हा उत्साह कधी धूनुची नृत्यात दिसतो तर कधी दांडिया तर कधी गरब्यात.

नवरात्रीमधील गरबा आणि दांडिया हा तरुणाईच्या जीवनाचा अविभाज्य घटक. अशा वेळी सर्वांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग केले जातात. यावेळी कपडे, हेअरस्टाईल, टॅटू, मेकअप अशा सर्व गोष्टींवर पुरेसे लक्ष देऊन तरुणी सजतात. त्यामुळे आज आम्ही गरबा-दांडिया रसिकांसाठी काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही नवरात्रीसाठी हटके मेकअप करून सर्वांपेक्षा वेगळे दिसू शकता.

> नवरात्रीमध्ये आपला चेहरा उठून दिसण्यासाठी आधी चेहऱ्यावर प्रायमर लावा आणि नंतर तुम्ही गोल्ड फाउंडेशन (लिक्विड) ट्राय करू शकता. फाउंडेशननंतर गालावर पावडर ब्लशचा देखील वापर करू शकता.

> कपड्यांसोबत मॅचींग असे आयशॅडो डोळ्यांचे सौंदर्य अजून वाढवतील. डोळ्यांना डार्क आय पेन्सिल किंवा आय लायनरच्या मदतीने सजवा.

> शक्यतो मॅट फिनिश लिपस्टिक वापरा. लाल, पीच, स्ट्रॉबेरी रेड शेड्सच्या लिपस्टिक्स लोकांचे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण मेकअप झाल्यावर पावडर ब्रश संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा.

> जर रात्री उशीरापर्यंत गरबा खेळणार असाल तर वॉटरप्रुफ मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करा. यामुळे घाम आला तरीदेखील मेकअप खराब होणार नाही.

> सध्या सिल्व्हर दागिन्यांचा ट्रेंड आहे. त्यामुळे विविध प्रकारचे मोठे सिल्व्हर नेकलेस, पायांमध्ये पैंजण आणि रंगी-बेरंगी बांगड्यांसह तुम्ही मोठे झुमके वापरू शकता.

> कोणतीही हेअर स्टाईल करण्याआधी केसांना सिरम लावा, यामुळे तुमच्या केसांना एक वेगळी चमक प्राप्त होते. हेयर एक्सेसरीजचा वापर केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर ठरेल.

> नवरात्र उत्सवाच्या काळात हातावर, दंडावर, पाठीवर, मानेवर अशा ठिकाणी काढलेले टॅटू देखील तुम्हाला अजून सुंदर बनवू शकतात.