Things to do during 2 days lockdown: दोन दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये वेळ कसा घालवाल? जाणून घ्या काही पर्याय
Photo Credit: unsplash

राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारकडून यावर वेगवेगळे उपाय केले जात आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारकडून मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये शुक्रवार रात्री पासून सोमवार सकाळपर्यंत हा लॉकडाऊन पाळला जाणार आहे. त्यामुळे ज्या वीकेंड ची आपण वाट बघत असतो. ज्या वीकेंड ला आपण आपल्या मित्र- मैत्रिणींना भेटतो. ते आपल्याला 30 एप्रिल पर्यंत करता येणार नाही. पण मग वीकेंड ला काय करणार ? आणि कसा वेळ घालवणार ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत काही पर्याय ज्याचा वापर तुम्ही वीकेंड ला तुमचा वेळ जावा म्हणून नक्कीच करू शकता. चला तर मग पाहूयात काय आहेत ते पर्याय. (Money Plant Benefits: घरात मनी प्लांट लावण्याचे 'हे' आश्चर्यचकीत करणारे फायदे तुम्हाला माहीत आहेत का )

सध्या OTT प्लेटफॉर्म वर आपल्याला खुप वेगवेगळया गोष्टी बघण्यासारख्या आहेत आणि तय ही हव्या त्या भाषेत. आठवड्याला काहीना काही काम असल्यामुळे आपल्याला मनाप्रमाणे ते पाहता येत नाही. तेव्हा तुम्हाला सिनेमे पहायला आवडत असेल तर तुम्ही दोन दिवसात मनसोक्त सिनेमे पाहू शकता.

 

तुम्ही खवय्ये असाल तर तुम्ही या दिवसात एक तरी तुमची आवडती किंवा घरातील इतर माणसाच्या आवडीची डिश नक्कीच बनवू शकता. किमान मदत घेऊन ते बनवण्याचे ट्राय तरी करू शकता.

 

तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुमच एखादे आवडीचे पुस्तक तुम्ही डॉन दिवसात भरपूर आणि पटापट वाचून संपवू ही शकता. (Weight Loss Tips: उपाशी न राहता रोजच्या दिवसात 'हे' बदल करुन तुम्ही ही करू शकता वजन कमी; जाणून घ्या सोप्या टिप्स )

 

तुम्हाला झाडे आवडत असतील, गार्डनिंग आवडत असेल तर मग तुम्ही हा वेळ झाडांच्या सनिध्यात घालवू शकता. झाडांची निगा घेऊ शकता, एखाद झाड लावू शकता.

 

घरातील माणसांबरोबर वेळ घालवायला कोणाला आवडत नाही. या दिवशी सगळेच घरी असणार आहेत मग तुम्ही मस्त पत्ते , कॅरम , चिट्ठया असेल अनेक मजेदार गेम खेळू शकता. एकत्र सिनेमा ही पाहू शकता.

 

तुम्हाला चित्रकलेची किंवा इतर कोणतेही छंद असतील तर हे दोन दिवस तुम्ही तुमच्या छंदातील एखादे काम करू शकता. जे करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही.