Surya Grahan 2021: शनि जयंतीच्या दिवशी 148 वर्षानंतर होणार सूर्यग्रहण; 'या' गोष्टी ग्रहण असताना चुकूनही करू नका 
Photo Credit: Pixabay

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून सूर्यग्रहणाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. सर्व 12 राशींचा चांगला आणि वाईट परिणाम सहन करावा लागतो. या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण गुरुवार, 10 जून रोजी आहे. शनि जयंती आणि ज्येष्ठ अमावस्या देखील या दिवशी आहेत. हे सूर्यग्रहण विशेष आहे कारण शनि जयंती दिवशी हे ग्रहण सुमारे 148 वर्षांनंतर आले आहे. यापूर्वी शनि जयंती दिवशी सूर्यग्रहण 26 मे 1873 रोजी झाले होते.तथापि, हे ग्रहण अंशतः भारतात दिसून येईल. ते देशात दिसणार नाही, त्यामुळे या सूर्यग्रहणावेळी सूतक लागणार नाही. ज्या ठिकाणी ग्रहण दिसते त्याच ठिकाणी सूतक पाळले जाते.पण या काळात नियमांचे पालन केले पाहिजे, असे ज्योतिषांचे मत आहे. (Solar Eclipse 2021: यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला; पहा कसं, कधी, कुठे पहाल?)

सूर्यग्रहण वेळ

 • सूर्यग्रहण - 10 जून, दिवस गुरुवार
 • वेळः दुपारी 01:42 पासून प्रारंभ
 • 06:41 वाजता समाप्त

सूर्यग्रहणात काय करावे आणि काय करू नये

 • ग्रहण, सूर्य किंवा चंद्र काहीही असो, यावेळी खाण्यास मनाई आहे.
 • कोणतीही नवीन कामे सुरू करू नका.
 • मांगलिक काम करू नये.
 • नखे काढणे ,केस विचरण्यास मनाई आहे.
 • ग्रहणकाळात झोपू नये.
 • चाकू किंवा तीक्ष्ण वस्तू वापरू नका.
 • ग्रहण होण्यापूर्वी शिजवलेल्या खाद्यात तुळशीची पाने घाला.
 • ग्रहणाच्या वेळी ईष्टदेवची पूजा करा. त्याचे मंत्र जप करा.
 • ग्रहणाच्या वेळी घराच्या मंदिराचे दरवाजे बंद करा.
 • सूर्यग्रहणात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
 • ग्रहण संपल्यानंतर घर स्वच्छ करा. घरात गंगाजल शिंपडा.
 • ग्रहण संपल्यानंतर स्नान करा.

(सुचना : वरील सर्व गोष्टी माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी हे सर्व सत्य असल्याचा दावा करत नाही.)