Sex Partners Of Women: पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सेक्स पार्टनर अधिक, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणमध्ये खुलासा
Sex Partners Of Indian Women | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रशासित प्रदेश (Union Territories) आणि जवळपास 11 राज्यांमध्ये परुषांच्या तुलनेत महिलांचे लैंगिक जोडीदार म्हणजेच सेक्स पार्टनर ( (Sex Partner) ) अधिक असतात. नुकत्याच झालेल्या एका राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणमध्ये (National Family Health Survey) ही बाब पुढे आली आहे. काही पुरुष असेही आहेत ज्यांनी महिलांसोबत लैंगिक संबंध (Sexual Relations) ठेवले आहेत. पण, ती महिला त्यांची पत्नी नाही किंवा ते लिव्ह-इन-रिलेशनशिप (Live-in-Relationship) मध्ये राहात नाहीत. अशा पुरुषांची संख्या 4% आहे. महिलांच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. पती नसणाऱ्या किंवा सोबत राहात नसणाऱ्या परुषांसोबत सेक्स करणाऱ्या महिलांची संख्या 0.5% इतकी आहे. नेशनल फैमिली हेल्थ सर्वे (National Family Health Survey) अहवालात ही माहिती पुढे आली आहे. यात सर्व्हेक्षणामध्ये 1.1 लाख महिला आणि एक लाख पुरुष सहाभागी झाले होते. या सर्व्हेमध्ये पुढे आले की, अनेक राज्यांमध्ये महिलांची आपल्या लैंगिक जोडीदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.

राजस्थान, हरियाणा, चंडीगढ, जम्मू-कश्मीर, लद्दाख, मध्य प्रदेश, असम, केरल, लक्षद्वीप, पुदुचेरी आणि तामिळनाडू अशा राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचा नॅशनल फॅमेली हेल्थ सर्वेत सहभाग आहे. राजस्थानचा समावेश अशा राज्यांमध्ये आहे जिथे महिलांचे पुरुषांच्या तुलनेत सरासरी सेक्स पार्टनर 3.1 आहे. तर पुरुषांचे प्रमाण 1.8 इतके आहे. दरम्यान, ज्या पुरुषांनी महिलांशी संबंध ठेवले आहेत किंवा आजही त्यांचे त्या महिलांशी संबंध आहेत. पण, त्या त्यांच्या पत्नी नाहीत किंवा ते सोबतही राहात नाहीत. अशा पुरुषांचे प्रमाण 4% आहे. दरम्यान, अशा महिलांची संख्या परुषांच्या तुलनेत कमी आहे. ही संख्या केवळ 0.5% आहे. (हेही वाचा, Sex Drive & Libido: तुमची कामवासना अर्थातच सेक्स करण्याची इच्छा कमी करू शकतात ही 7 औषधे; घ्या जाणून)

नेशनल फैमिली हेल्थ सर्वेमध्ये सन 2019 ते 2021 या काळात देशातील 28 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमधील 707 जिल्ह्यांमध्ये अभ्यास करण्यात आला.या सर्वेमध्ये सामाजिक आणि आर्थिक डेटाच्या बाबतीतही बोलण्यात आले.