मुलांच्या या गुणांवर मुली भाळतात (Photo Credit: Pixabay)

मुली फ्रेंड्स असाव्यात, असे प्रत्येक मुलाला वाटते. त्यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात. पण मुलींना नेमकी कशी मुलं आवडतात ठाऊक आहे? एका सर्वेक्षणानुसार, मुलींच्या मनात त्यांच्या पार्टनरबद्दलची प्रतिमा तयार असते. पण अनेकदा या गोष्टी त्या कोणाही सोबत शेअर करत नाही.

मात्र मुलांमधील काही गुण मुलींना त्यांच्या लूकपेक्षा अधिक भावतात. तर जाणून घेऊया कोणते आहेत ते गुण...

सुरक्षितता

आपल्या पार्टनरसोबत सुरक्षित वाटावे, असे प्रत्येक महिलेला वाटते. प्रत्येक कठीण प्रसंगात आणि अडीअडचणीच्या वेळी त्याने साथ देणे, हे पुरुषांमधील गुण स्त्रियांना अधिक भावतात.

बोलणे मनापासून ऐकणे

तुम्ही लक्षपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, मुली फार बडबड्या असतात. अबोल मुली फार कमीच असतील. त्यामुळे आपले म्हणणे काळजीपूर्वक ऐकणारा, त्यात इंटरेस्ट घेणारा पार्टनर मुलींना भावतो. त्यामुळेच जर गर्लफ्रेंड किंवा पत्नीला खुश करायचे असेल तर त्यांचे म्हणणे नीट ऐका.

प्रामाणिक मित्र

खरे, प्रामाणिक पुरुष महिलांना फार आवडतात. पार्टनरने कधीच आपल्याशी खोटे बोलू नये आणि नाते अगदी प्रामाणिकपणे निभवावे, अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते.

केअरिंग पार्टनर

महिला खूप भावनिक आणि संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणारा, त्यांना समजून घेणारा, त्यांचे दुःख जाणणारा पार्टनर त्यांना अगदीच खास वाटतो.

मदत करण्याच स्वभाव

मदत करण्याचा पुरुषांचा स्वभाव महिलांना फारच भावतो. या गुणांचा त्यांना आदर वाटतो.

त्यामुळे जर तुमच्यातही हे गुण असतील तर तुमच्याकडे महिला नक्कीच आकर्षित होतील. किंवा हे गुण नसल्यास तुम्ही ते अंगिकारून महिलांना इम्प्रेस करु शकता.