Sex Tips: सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी नियमितपणे करा व्यायाम आणि योगाचे 'हे' प्रकार
Sex Addiction । (Photo credit: archived, edited, and only symbolic images)

रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकदा जोडप्यांमध्ये सेक्ससाठी स्टॅमिना शिल्लक राहत नाही. रोजच्या कामामुळे आलेला थकवा यामुळे शरीर एकदम थकून जाते. अशा वेळी अनेकदा आपली वा आपल्या आपल्या पार्टनरची इच्छा असून जोडप्यांमध्ये संभोग होत नाही. याला अनेकदा तुमचे दैनंदिन जीवन, तसेच तुमच्या खाण्या-पिण्याच्या वेळा कारणीभूत असते. तसेच मद्यपान (Drinking), धूम्रपान (Smoking) यासारख्या व्यसनांमुळेही तुमचे शरीर कमकुवत बनते. अशा वेळी नियमित काही व्यायाम प्रकार केल्यास तुम्हाला शरीर बळकट होईल आणि सेक्स स्टॅमिना (Sex Stamina) वाढविण्यास मदत होईल.

मात्र सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी काही ठराविक व्यायाम प्रकार आणि योगा करणे गरजेचे आहे. ते योगा प्रकार अथवा व्यायाम प्रकार कोणते हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असेल.

योगा प्रकार

भुजंगासन, पश्चिमोत्तासन यासारखी आसनं सेक्सलाईफ सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे तुमच्या जननेंद्रियांना होणारा रक्तपुरवठा सुधारतो. त्यामुळे सेक्सचा आनंद घेण्यासाठी या योगासनांचा नक्कीच फायदा होतो. Sex Tips for Men: महिला पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी केस, नखांसह 'या' गोष्टींचा वापर करत घ्या फोरप्ले चा आनंद

व्यायाम प्रकार:

1. कीगल व्यायाम (Kegel Exercise) 

या व्यायामप्रकारामुळे इरेक्शनची समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सेक्सचा आनंद वाढतो. यामध्ये तुम्ही असं समजा की तुम्ही मुत्रविसर्जन करताय पण फ्लो रोखताय. असे नियमित 10 वेळा करणे तुम्हांला फायदेशीर ठरू शकते.

2. हाताचे आणि पोटाचे स्नायू बळकट करा पुश-अप्स करा

बर्‍याच सेक्स पोजिशन्समध्ये पुरूष स्त्रियांना सावरतात. त्यामुळे स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी तुमचे मसल्स मजबूत असणे गरजेचे आहे. म्हणूनच तुमचे मसल्स कमजोर पडणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच लठठ लोकांनी नियमित व्यायाम करा. म्हणजे तुमच्या जननेंद्रियाला पुरेसा रक्तपुरवठा होतो.

या व्यायाम प्रकारामुळे हाता-पायाचे स्नायू बळकट होऊन सेक्सचा तुम्हाला दीर्घकाळ अनुभव घेता येईल. तसेच सेक्स दरम्यान तुम्हाला थकवा जाणवणार नाही.