प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Sex Frequency by Age: अजूनही भारतामध्ये शारिरीक संबंधांसंबंधीच्या (Sex) म्हणजेच सेक्सच्या चर्चांना अनेकदा निषिद्ध मानले जाते, परंतु अलीकडेच एका नवीन अहवालात या विषयावर उघडपणे चर्चा झाली आहे. या अहवालामुळे जगभरातील हजारो लोकांच्या लैंगिक जीवनाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. इंडियाना युनिव्हर्सिटीच्या किन्से इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी हा अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या पिढीतील लोक एका महिन्यात सरासरी किती वेळा सेक्स करतात याची माहिती देण्यात आली आहे. या अहवालातील आकडेवारी धक्कादायक असून जनरेशन झी (Gen Z) चे लैंगिक जीवन मागील पिढ्यांपेक्षा खूपच कमी सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे.

या अहवालाचे शीर्षक ‘ The State of Dating: How Gen Z is Redefining Sexuality and Relationships' असे आहे. हा अहवाल फील्ड नावाच्या डेटिंग ॲपवरील 3,310 हून अधिक लोकांच्या डेटावर आधारित आहे. या सहभागींचे वय 18 ते 75 वर्षांच्या दरम्यान होते आणि ते 71 वेगवेगळ्या देशांतील होते. त्यांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आले.

अहवालातील आकडेवारीनुसार, सरासरी, जेन झी सहभागींनी गेल्या महिन्यात फक्त तीन वेळा सेक्स केल्याचे नोंदवले. दुसरीकडे, मिलेनिअल्स (Millennials) आणि जनरेशन एक्स (Generation X) मध्ये जरा जास्त सेक्स होता, या दोन्ही पिढ्यांनी गेल्या महिन्यात पाच वेळा सेक्स केला होता. बूमर्सनी गेल्या महिन्यात सरासरी फक्त तीन वेळा सेक्स केला. हा डेटा दर्शवितो की, जेन झी आणि बूमर्सचे लैंगिक जीवन जवळजवळ तितकेच कमी सक्रिय आहे.

या ठिकाणी बेबी बूमर्स (बहुतेकदा बूमर्स) म्हणजे 1946 ते 1964 या काळात जन्मलेले लोक, मिलेनियल्स म्हणजे 1981-1996 दरम्यान जन्मलेले लोक आणि जेन झी म्हणजे 1997-2012 दरम्यान जन्मलेले लोक. अहवालानुसार, जेन झी आणि बूमर्स दोघांची लैंगिक वारंवारता जवळजवळ सारखीच आहे, हे दर्शविते की सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर प्रौढांमध्ये सर्वात कमी सक्रिय लैंगिक जीवन आहे. (हेही वाचा: New Form of Sexual Attraction Symbiosexuality: लैंगिक आकर्षणाचे नवीन स्वरूप 'सिम्बायोसेक्शुअलिटी')

संशोधकांचे म्हणणे आहे की, जेन झी पिढीतील लोकांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कमी वेळ मिळतो, कारण ते त्यांच्या करिअर आणि इतर गोष्टींकडे जास्त लक्ष देतात. दरम्यान, संशोधकांचे म्हणणे आहे की, लैंगिक संभोगाची योग्य संख्या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. काहींसाठी, आठवड्यातून एकदा लैंगिक संभोग करणे पुरेसे असू शकते, तर काहींना ते कमी वाटू शकते. मात्र यामध्ये तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही समाधानी असणे सर्वात महत्वाचे आहे.