Monsoon Sex Tips: पावसाळ्यात आपल्या जोडीदारासोबत सेक्स दरम्यान रोमान्स वाढविण्यासाठी बेडवर करा 'या' रोमांचक गोष्टी
Romance in Rain (Photo Credits: File Photo)

सेक्स (Sex) ही गोष्ट तुम्हाला तुमच्या जोडीदाराला शरीराने जवळ आणते ज्यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट बनते. सेक्ससाठी पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू खूप रोमँटिक वातावरण निर्माण करणारे असतात. विशेषत: पावसाळ्यात (Monsoon) हवेत निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणामुळे सेक्सची तीव्र इच्छा होते. अशावेळी बेडवर हा रोमान्स टिकवण्यासाठी जोडप्याने काही हटके आणि रोमँटिक गोष्टी ट्राय करणे गरजेचे आहे. आपल्या जोडीदारासोबत पावसाळ्यात सेक्सचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या हॉट आयडियाज नक्कीच फायदेशीर ठरतील.

सेक्स दरम्यान आपले संपूर्ण लक्ष आपल्या जोडीदाराकडे असले पाहिजे. अशा वेळी मोबाईल, आयपॅड, हेडफोन यांसारख्या गोष्टी तुमच्यापासून दूर ठेवाव्यात. त्यासोबतच बेडवर काही काही थ्रिलिंग गोष्टी केल्या पाहिजे.

1. स्पून पॉझिशन

तुमचा पार्टनर बेडवर एका कुशीवर तुम्हाला पाठ करुन झोपला असेल तर त्याच्या पाठीवर हळूवारपणे हात फिरवून त्याचा मूड बनवला पाहिजे. अशा वेळी तुम्ही सेक्सची स्पून पॉझिशन देखील करु शकता.

2. पार्टनरला घट्ट मिठी मारा

बेडवर तुमच्या पार्टनरला घट्ट मिठी मारा आणि तिचे चुंबन घ्या. तुमचे पाय तिच्या मांड्यावर घेऊन तिला कवेत घ्या. यात तुम्हाला स्वर्गसुख मिळेल. Monsoon Sex Tips: पावसाळ्यात जोडप्यांमधील Romance वाढविण्यासाठी 'सुपरहॉट' सेक्स आयडियाज

3. तुमच्या बेडमध्ये मंद प्रकाश ठेवा

पावसाळ्यात सेक्सदरम्यान बेडरूममध्ये लाईटचा मंद प्रकाश ठेवा. अशा वेळी आपल्या जोडीदाराला किस करुन त्याचा कानाचे चुंबन घेऊन छान रोमँटिक मूड बनवू शकता.

4. बेअर पॉझिशन

बेडवर सेक्स दरम्यान बेअर पॉझिशन खूप मस्त फिलिंग आणते. कारण या पॉझिशन मध्ये तुमचा पार्टनर तुमच्यावर असतो ज्यामुळे तुम्हाला पावसातील बाहेरील गारव्यात सुद्धा छान उब मिळते.

5. आरामदायी कपडे घाला

सेक्स दरम्यान अवघड कपड्यामुळे तुमच्या पार्टनरला ते काढण्यात वेळ जातो. अशा वेळी स्ट्रिप, लेस वाले कपडे घालावे अथवा न्यूड होऊन आपल्या भोवती ब्लँकेट गुंडाळावे. यामुळे देखील तुम्हाला सेक्सचा परमोच्च आनंद मिळेल.

पावसाळ्यात वातावरणात आलेल्या गारव्यामुळे तुम्हाला खरी उब ही तुमच्या जोडीदारासोबत बेडवर अनुभवता येईल. अशा वेळी या हटके गोष्टी ट्राय करायला काही हरकत नाही.