Masturbation Hygiene Tips: हस्तमैथुन केल्यानंतर सेक्स टॉय कशी कराल स्वच्छ? जाणून घ्या 'या' खास टिप्स
Smart sex toy, Lioness vibrator. (Photo Credits: YouTube Grab)

शारीरिक संबंध (Sexual Relation) हा प्रत्येक जोडप्यातील एक महत्त्वाचा आणि खास टप्पा आहे. मात्र सुरक्षित सेक्स करणे हे देखील तितकेची महत्त्वाचे आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे अनेकांना सुरक्षित सेक्स (Safe Sex) करण्यासाठी हस्तमैथुन या पर्यायाचा अवलंब करावा असे सांगण्यात येत आहे. यात अनेक जण सेक्स टॉय (Sex Toy), सेक्स क्रिया आणि हस्तमैथुन (Masturbation) या गोष्टींचा वापर करतात. य़ामुळे देखील तुम्हाला सेक्स सुखद अनुभव घेता येतो. मात्र यामध्ये वापरण्यात येणारे सेक्स टॉय वापरल्यानंतर ते योग्य रित्या स्वच्छ करणे देखील तितकेच गरजेचे आहे. सेक्स टॉयचा वापर करण्याआधी आणि केल्यानंतर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

खरे पाहता, सेक्स टॉय मोटराइज्ड आणि नॉन मोटराइज्ड असतात. मोटराइज्ड सेक्स टॉय वा वायब्रेटर बॅटरी द्वारा संचटलित असतात. त्यामुळे त्याला स्वच्छ करण्यासाठी त्याला पाण्यात बुडवून धुवायचे नसतात. याउलट नॉन मोटराइज्ड सेक्स टॉय साबण, पाणी आणि मऊ कपड्यांचा वापर करुन धुवायचे असतात.

पाहूयाता सेक्स टॉय साफ करण्याचे प्रकार

1. नॉन मोटराइज्ड

हे सेक्स टॉय वापरण्याआधी ते उकळत्या पाण्यात बुडवावे. सेक्स टॉय साफ करण्याआधी ते उकळत्या पाण्यात ठेवावे. त्यानंतर साबणाने त्याला चांगले चोळून धुवावे.उकळत्या पाण्याचा उपयोग तुमचे वायब्रेटर स्वच्छ करण्यासाठी होतो. Hot Sex Tips: सेक्स च्या बोअरिंग रुटीन ला करा Bye! पार्टनर सोबत बेडरूम मध्ये खेळून पहा 'हे' सेक्सी गेम्स

2. सेक्स टॉय धुतल्यानंतर ते एका टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या. त्याआधी तुम्ही जो टॉवेल वापरणार आहात तो स्वच्छ आहे की नाही हे तपासून घ्या. जर ते टॉवेल स्वच्छ नसेल तर त्यातील जंतू सेक्स टॉयवर जातील.

3. सेक्स टॉय पुसून झाल्यानंतर ते कोणत्यारी केस किंवा बॅगमध्ये ठेवा. या टॉयला कव्हर केल्या शिवाय कपाटात ठेवू नका. जेणेकरुन यावर जंतू पसरणार नाही.

बाजारात फोम क्लीनरचे अनेक पर्याय आहेत. ज्याचा उपयोग मोटराइज्ड आणि नॉन मोटराइज्ड सेक्स टॉय साफ करण्यासाठी केला जाऊ शकतो. सेक्स टॉय साफ करण्यासाठी तुम्ही ऑनलाईनही फोम क्लीनर मागवू शकता.