Global Orgasm Day 2019: सेक्स करतेवळी ऑर्गेज्मचा अनुभव घेण्यापासून दूर ठेवतात 'या' गोष्टी; असा करा उपाय
Image For Representations (Photo Credits: File Image)

सेक्स (Sex) आणि त्याचा अद्भुत आनंद ज्यांनी अनुभवला असेल त्यांना वेगळ्याने ऑर्गेज्मचे (Orgasm) महत्व सांगायला नको. शारीरिक संबंधांतील तो परमोच्च सुखाचा क्षण आहे असे म्हणतात, ऑर्गेज्म ही खरतर अत्यंत नैसर्गीक बाब आहे काहींना तर एकाच वेळेत अनेकदा हा अनुभव घेता येतो तर काहींना कितीही पद्धती ट्राय केल्या तरी ही अनुभूती प्राप्त होत नाही.  पण मग हा ऑर्गेज्म नेमका कोणत्या कारणामुळे अनुभवता येत नाही याचा विचार केलायत का? काहीवेळेस स्त्रिया पार्टनरच्या लिंगाचा आकार लहान असल्याचे कारण देत आपली नाराजी व्यक्त करतात पण  हे यामागील मूळ कारण नसून तुमच्या सेक्स लाईफ मध्येच नकळत घडणाऱ्या चुकांमुळे तुम्ही या सुखापासून दुरावले जात असता. या चुका कोणत्या आणि त्या कश्या टाळाव्यात हे आज आपण पाहणार आहोत.

(Sex Tips: Boring सेक्स लाईफ Interesting करण्यास मदत करतील या '5' भन्नाट आयडियाज)

आज म्हणजेच 21 डिसेंबर हा दिवस ग्लोबल ऑर्गेज्म डे म्ह्णून साजरा केला जातो, याच निमित्ताने चला तर मग पाहुयात कसा मिळवावा ऑर्गेज्म..

औषधांचा अतिवापर

छोट्या मोठ्या कारणांसाठी औषधे घेणे टाळावे असा सल्ला कित्येकदा डॉक्टर सुद्धा देत असतात, या अतिरिक्त केमिकल्समुळे शरीरावर परिणाम होण्याची भीती असते. अभ्यासकांच्या माहितीनुसार काही औषधे जसे की, SSRIS हे नैराश्य घालवण्यासाठी वापरले जाणारे औषध सेक्स हार्मोन्सला मारक असते, हार्मोन्सच्या कमतरतेमुळेच ऑर्गेज्म अनुभवण्यात बाधा येते. त्यामुळे यावर उपाय काढायचा असल्यास आपल्या डॉक्टरांशी संवाद साधून पर्यायी औषधे निवडण्यावर भर द्या.

फोरप्ले कमी पडतोय

सेक्स म्हणजे केवळ लैंगिक क्रिया नसून ही अनुभूती आहे, त्यामुळे ज्या लोकांना थेट पेनिट्रेशन करण्याची घाई असते त्यांना अधिक काळ ऑर्गेज्म चा अनुभव येत नाही. यावर उपाय म्हणजे फोरप्ले, तुमच्या पार्टनरच्या शरीराला जवळून अनुभवा जेणेंकरून सेक्सचा मूड सेट होईल. हा मूड पुढे टिकवून ठेवण्यासाठी सेक्स करतेवेळी किसिंग, लिकिंग हे प्रकार करणे निवडा.

तणावामुळे अडतंय

अनेकांना सेक्स करतेवेळी वेगवेगळ्या गोष्टी डोक्यात फिरत असल्याने पूर्ण लक्ष केंद्रित करता येत नाही, काहींना आपण सेक्स कसा करू याचाच तणाव असल्याने हा अनुभव वाईट होत जातो. हे रोखण्यासाठी तुम्ही सेक्स पूर्वी स्वतःच्या मनाला तयार करायला हवे. इच्छा असताना आणि आनंदाने सेक्स केल्यास हा सुखाचा क्षण टिकून राहतो.

ल्युब्रिकेशनचा अभाव

असं म्हणतात की 40 % महिला या सेक्सवेळी नैसर्गिक ल्युब्रिकेशनच्या अभावाने असंतुष्ट राहतात. त्यामुळे योनीमध्ये योग्य प्रमाणात ओलावा असणे आवश्यक आहे, काही बाजारातील उपकरणे वापरून देखील हा ओलावा मिळवता येतो मात्र फोरप्लेमुळे नैसर्गिकरित्या सेक्स ड्राइव्ह निर्माण होण्यास मदत होते.

स्वतःचे शरीर जाणून घ्या

तुम्हाला कित्येकदा स्वतःच्या शरीराची सेक्स करतानाच्या स्वतःच्या आवडीची पुरेशी माहिती नसल्यास देखील ऑर्गेज्म पासून दूर राहावे लागू शकते. त्यामुळे तुमच्या पार्टनर्शी बोलून तुमच्या आवडीनिवडी समजून घ्या. काहींना वाईल्ड तर काहींना सौम्य सेक्स हवाहवासा असतो पण हे समोरच्या व्यक्तीला न कळल्यास हा अनुभव तुम्हाला आवडेनासा होतो.

लक्षात घ्या जेव्हा नेहमीच्या आयुष्यातही आपण एखादी गोष्ट आवडीने करतो तेव्हा तिचा प्रभाव हा जास्त उत्तम ठरतो त्यामुळे सेक्स करण्याची उच्च हे ऑर्गेज्म मिळवण्याची पहिली स्टेप आहे हे समजून घ्या. सेक्स करताना, करण्याआधी आणि केल्यावर तुमच्या आणि पार्टनरच्या डोक्यातील विचार माहिती असणे आवश्यक आहे.