प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्समध्ये (Sex) बऱ्याचवेळा स्त्रियांना पूर्ण सुख (Orgasm) मिळण्याआधीच पुरुषांचे वीर्यस्खलन (Ejaculation) होते. अशावेळी पुरुषाला तर परमोच्च सुख मिळते, मात्र स्त्रियांचे काय? स्त्रियांना सेक्समध्ये पूर्णतः समाधानी करण्यासाठी आधी जाणून घ्या, त्यांना परमोच्च सुखापर्यंत पोहचण्यासाठी नक्की किती वेळ लागतो. महिलांना Multiple Orgasms होतात. मात्र एका वेळी पूर्ण तृप्ती प्राप्त होण्यास महिलांना सरासरी 13 मिनिटे, 25 सेकंद लागतात. याबाबत झालेल्या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, 'बर्‍याच वेळा स्त्रिया लैंगिक संबंधांमध्ये भावनोत्कटतेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यांना सेक्समध्ये पूर्ण सुख मिळाले नाही तर ती गोष्ट त्यांच्या वागण्यात दिसू शकते.'

केलेल्या अभ्यासानुसार, महिलांना त्यांचे 'संभोग सुख' मोजण्यासाठी स्टॉपवॉचचा वापर करण्यास सांगण्यात आले. म्हणजेच संभोग करताना, जेव्हा त्या अराउज होतात तेव्हा त्यांना वॉच सुरु करण्यास सांगितले व जेव्हा त्यांना पूर्ण सुख मिळाले तेव्हा त्यांनी वॉच बंद केले. यावेळी सरासरी मोजली जाणारी वेळ 13 मिनिटे 25 सेकंद होती. (हेही वाचा: 53 टक्के विवाहित भारतीय महिलांनी ठेवले आहेत विवाहबाह्य संबंध; देशातील Married Women बाबतच्या सर्वेक्षणामधून समोर आले धक्कादायक सत्य)

अभ्यासामध्ये असेही दिसून आले आहे की, 90% स्त्रियांना सेक्सच्या वेळी पुरुषांच्या शरीरावर असणे आवडते. दहापैकी नऊ महिलांनी सांगितले की, सेक्समध्ये पुरुषांच्या वर राहिल्याने सेक्स जास्त काळ चालतो. ऑक्टोबर 2017 ते गेल्या सप्टेंबर दरम्यान झालेल्या अभ्यासानुसार, 21 देशांमधील एकूण 645 स्ट्रेट महिलांनी यात भाग घेतला होता. Fake Orgasm हा सेक्सचा आणखी एक पैलू आहे, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मोठ्या संख्येने महिलांनी सांगितले की, त्या फक्त आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी खोटे खोटेच आनंद मिळाल्याचे सांगतात. याशिवाय बर्‍याच स्त्रियांनी, त्यांना सेक्स करताना हस्तमैथुन करण्यास आवडत असल्याचे सांगितले.