Parenting Tips: मुलांच्या परिक्षा लवकच संपतील त्यानंतर मुले उन्हाळ्यात घरी बसून पुढे काय करायाचे हे नक्की ठरवतील. शाळा आणि अभ्यासापासून सुटका मिळाली त्यांना काही नवीन करण्याची इच्छा होते परंतु काही वेळा त्या अपयशी होतात. त्यामुळे पालकांनी देखील या कडे पूर्ण पणे लक्ष द्यावे. जर पालकांनी याकडे दुर्लक्ष केले तर मुलांवर याचा परिणाम होऊ शकतो. सर्वांत आधी मुलांना मोबाईल आणि टीव्ही पासून काही प्रमाणात दूर ठेवा. यामुळे त्यांना दुसऱ्या गोष्टींकडे पूर्ण वेळ देता येईल. चला तर जाणून घेऊयात या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना कोणत्या गोष्टी शिकवू शकतो. (हेही वाचा- जर तुमचीही झोप कमी होत असेल तर व्हा सावध! स्मरणशक्तीसोबतच मेंदूवरही होऊ शकतो विपरीत परिणाम, जाणून घ्या काय सांगतो AIIMS चा अभ्यास
वाचण आणि लिखण- कित्येक पालक असा विचार करतात की, आपला मुलगा शाळेत लिखाण वाचण करतो मग घरी कशाला? पालकांनी या गोष्टी कडे अजिबात दुर्लक्ष करू नयेत. मुळात आपल्या मुलांना अंवातर वाचण आणि लिखाण करण्याची सवय लावा. यासाठी पालकांनी मुलांना एकाद्या परिस्थीतीवर किंवा घटनेवर त्याला लिहण्यास सांगा. आठवड्यातून दोनदा किंवा लिहण्यास सांगितले तरी चालेल. यामुळे त्याच्या बुध्दीला चालना मिळेल आणि लेखन कौशल्य सुधारेल. काही गोष्टींचे पुस्तके आणून द्या आणि त्याचे वाचण करण्यास सांगा. रात्री झोपण्यापूर्वी वाचण करणे हा सर्वात फायदेशीर असलेला घटक आहे.
चित्रकला - आपल्या मुलांच्या आवडी प्रमाणे चित्रकला किंवा क्राफ्ट क्लास लावा. जेणे करून त्याला या विषयाची तोंड ओळख होईल. क्राफ्टमुळे देखील मुलांच्या अनेक कल्पनांना चालना मिळते. क्लासेसमुळे मुलांना कला विषय आवडू लागतो.
खेळ- मुलांच्या आवडी निवडी जोपासणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या आवडीप्रमाणे, त्यांच्या खेळाना प्रोत्साहन करत जा जेणे करून मुलांचा आत्मविश्वास वाढू लागेल. खेळाच्या कोचिंगला पाठवणे हा देखील उत्तम पर्याय होऊ शकतो.
छंद- आपल्या मुलांचे छंद काय आहेत हे जाणून घेणे पालकांचे काम आहे त्यामुळे त्यांना या उन्हाळाच्या सुट्टीत छंद जोपासण्यास मदत करावी. लहान वयात मुलांनी छंद जोपासायला हवा जेणे करून त्यांना त्यांच्या आवडी निवडी कळू लागती.