Unique Baby Names From Lord Krishna: आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. श्रीकृष्ण यांना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आज श्रीकृष्ण भारतीयांच्या मुखात आहेत. श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. ते प्रेम, करुणा, धैर्य आणि दैवी ज्ञानाचे प्रतिक मानले जातात. श्रीकृष्णाचे अनेक नावे आहेत. या शुभ मुहूर्तावर त्यांच्या नावांमधून आपल्या मुलाला एक सुंदर, युनिक आणि अर्थपूर्ण नाव द्या, जे त्यांच्या जीवनातील सकारात्मक उर्जेचे प्रतिक ठरेल. असे म्हटले जाते की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो. (हेही वाचा-देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष, मथुरा आणि वृंदावन फुलांनी सजली)
1. श्रीहन- श्री म्हणजे समृध्दी, आणि हन हे तुतारसाठी प्रसिध्द आहे. कृष्ण भगवान यांचे विचार समृध्द आहे. आज ही त्यांच्या विचारांचा पालन केले जाते.
2. कृषव- कृष्णा आणि शिव यांचा संयोग म्हणजे कृषव. या नावात दोन देवांची नावे समावलेले आहेत.
3. रुद्रनंंद - रुद्रनंद या नावाचा अर्थ भगवान श्रीकृष्ण असा आहे. रुद्र आणि कृष्णानंद यांचा संयोग आहेत. हे नाव युनिक आहे. रुद्र हा संस्कृत शब्द आहेत.
4. मुकुंद - हे नाव श्रीकृष्णाचे आहे. ज्याचा अर्थ मुक्तिदाता आहे. हे एक पौराणिक नाव आहे.
5. मनश्री- मन आणि श्रीकृष्णाचा मिलाप म्हणजे मनश्री. या नावाला स्वत: चे एक विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात कोणीही हे नाव आपल्या बाळाला देतात.
6. अधोक्षज - या नावाचा अर्थ नावाप्रमाणेत आहे. हे एक युनिक नावापैकी आहे. अधोक्षज म्हणजे कधीही न संपणारा व कधीही न क्षीण होणारा असा आहे.
7. युक्त- युक्त हे युनिक नाव आहे. युक्त हे एक मुलाचे नाव आहे. युक्त म्हणजे योग्य असा होतो.
8. कृषांक- कृषांक म्हणजे कृष्ण आणि अंश या दोन नावावरून हे नाव तयार झाले.