Marriott™

मॅरियट इंटरनॅशनल इन्‍क. (नॅसडॅक: एमएआर)ने आज मध्‍यम व उच्‍च दर्जाच्‍या निवास विभागांसाठी नवीन कलेक्‍शन ब्रँड 'सिरीज बाय मॅरियट™'च्‍या जागतिक लाँचची घोषणा केली, जेथे कंपनीने जगभरात आपल्‍या निवास ऑफरिंग्‍जमध्‍ये वाढ करणे सुरू ठेवले आहे. सिरीज बाय मॅरियट उत्तमरित्‍या स्‍थापित प्रादेशिक निर्मित ब्रँड्स व हॉटेल्‍सना सादर करत मॅरियटची जागतिक उपस्थिती विस्‍तारित करण्‍याची अपेक्षा आहे, जे मॅरियट बोनव्‍हॉय पोर्टफोलिओमध्‍ये सतत दर्जा व सेवेची भर करतात. सिरीज बाय मॅरियट अतिथींना अधिकाधिक ठिकाणी आरामदायी निवास देईल, तसेच प्रादेशिक मालकांना मॅरियटच्‍या प्‍लॅटफॉर्म्‍सचे फायदे, कंपनीचा पुरस्‍कार-प्राप्‍त मॅरियट बोनव्‍हॉय लॉयल्‍टी प्रोग्राम उपलब्‍ध करून देईल. या सुविधा देताना कंपनीच्‍या पोर्टफोलिओची स्‍वतंत्र ओळख कायम राखली जाईल.

सिरीज बाय मॅरियट मॅरियटसाठी प्रमुख विकास बाजारपेठ भारतातील कॉन्‍सेप्‍ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्‍हेट लिमिटेड (Concept Hospitality Private Limited) (सीएचपीएल) सोबतच्‍या संस्‍थापकीय कराराच्‍या माध्‍यमातून आपल्‍या पहिल्‍या लाँचला सादर करते. परम कन्‍नामपिल्‍ली यांच्‍याद्वारे १९९६ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली सीएचपीएल भारतातील आघाडीची हॉटेल मॅनेजमेंट कंपनी आहे, जिचा सहा ब्रँड्सचा पोर्टफोलिओ आहे आणि ९० ठिकाणी कार्यरत १०० हून अधिक हॉटेल्‍स आहेत. सीएचपीएल आणि मॅरियट यांच्‍यामधील धोरणात्‍मक करारांतर्गत सीएचपीएलचे प्रमुख ब्रँड्स - द फर्न, द फर्न रेसिडन्सी व द फर्न हॅबिटॅट भारतभरात विशेष आधारावर सिरीज बाय मॅरियटशी संलग्‍न होतील, तसेच मॅरियट सीएचपीएलमध्‍ये लहान इक्विटी गुंतवणूक करेल. द फर्न पोर्टफोलिओमध्‍ये सध्‍या ८४ खुल्‍या मालमत्ता आणि ३१ अंमलबजावणी करण्‍यात आलेल्‍या पाइपलाइन डिल्‍सचा समावेश आहे, ज्‍यामुळे एकूण ११५ मालमत्ता आणि जवळपास ८,००० रूम्‍स आहेत. फर्न मालमत्ता काळासह थर्ड-पार्टी हॉटेल मालकांसोबत चर्चा आणि या मालकांसोबत दीर्घकालीन फ्रँचायझी करारांची अंमलबजावणी केल्‍यानंतर भारतातील मॅरियटच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये सामील होण्‍याची अपेक्षा आहे. बहुराष्‍ट्रीय समूह सीजी कॉर्प ग्‍लोबलचा आदरातिथ्‍य विभाग सीजी हॉस्पिटॅलिटी सीएचपीएलमध्‍ये बहुतांश भागधारक आहे.

''सिरीज बाय मॅरियट योग्‍य ठिकाणी योग्‍य किमतीमध्‍ये मुलभूत सुविधा असलेल्‍या निवास ऑफरिंग्‍ज देण्‍याप्रती मॅरियटच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते,'' असे मॅरियट इंटरनॅशनलचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अॅन्‍थोनी कॅपुआनो म्‍हणाले. ''डिझाइन करण्‍यात आलेला नवीन, प्रादेशिक कलेक्‍शन ब्रँड मूल्‍याप्रती जागरूक पर्यटकांमध्‍ये मॅरियटची पोहोच वाढवेल, आमच्‍या विद्यमान मॅरियट बोनव्‍हॉय सदस्‍य व अतिथींना अतिरिक्‍त निवड देईल आणि स्‍थानिक मालकांना अधिक संलग्‍नतेच्‍या संधी देईल.''

कॅपुआनो पुढे म्‍हणाले, ''आम्‍हाला सीएचपीएलसोबतच्‍या संस्‍थापकीय कराराच्‍या माध्‍यमातून सिरीज बाय मरियट लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. हा करार कंपनीसाठी महत्त्‍वपूर्ण बाजारपेठ भारतात मॅरियटचे आघाडीचे स्‍थान अर्थपूर्णपणे विस्‍तारित करण्‍यास मदत करेल. जगभरातील इतर बाजारपेठांमध्ये सिरीज बायमॅरियट कलेक्शनच्या वाढीला गती देण्यासाठी आम्ही या मल्टी-युनिट कन्व्हर्जन कराराला मजबूत पाया मानतो. संपूर्ण भारतात फर्न पोर्टफोलिओला खूप महत्त्व दिले जाते आणि सीएचपीएलची ऑपरेशनल उत्कृष्टता व प्रादेशिक प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्याची कटिबद्धतेमधून सिरीज बाय मॅरियट ब्रँडचा उत्‍साह दिसून येतो.''

''भारत मॅरियटसाठी सर्वात डायनॅमिक व धोरणात्‍मक बाजारपेठ आहे, ज्‍यामुळे सिरीज बाय मॅरियटच्‍या लाँचसाठी अनुकूल आहे,'' असे मॅरियट इंटरनॅशनलचे चीन वगळता आशिया पॅसिफिकमधील अध्‍यक्ष राजीव मेनन म्‍हणाले. ''सीएचपीएलसोबतचा आमचा संस्‍थापकीय करार आम्‍हाला प्रादेशिक पर्यटकांशी संलग्‍न होणाऱ्या विश्‍वसनीय स्‍थानिक ब्रँडसोबत उद्देशपूर्णपणे विकास करण्‍याची संधी देतो. या सहयोगामध्‍ये सीएचपीएलचे सखोल बाजारपेठ ज्ञान आणि मॅरियटच्‍या जागतिक प्‍लॅटफॉर्मचे संयोजन आहे, ज्‍यामुळे दर्जात्‍मक आदरातिथ्‍य सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होतील आणि देशभरात प्रबळ विकास क्षमता अनलॉक होतील. भारतात लाँच करण्‍यात आलेल्‍या सिरीज बाय मॅरियटमधून आमच्‍या दीर्घकालीन विकास धोरणामध्‍ये प्रांताची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते.''

''सीएचपीएलमधील आमच्या बहुसंख्य हिस्सेदारीद्वारे आम्ही द फर्न ब्रँड्सना भारतातील पर्यावरण-संवेदनशील, उच्‍च-गुणवत्तेच्या आदरातिथ्यासाठी मानक-वाहक म्हणून विकसित केले आहे. सिरीज बाय मॅरियटचा भाग असल्याने आम्हाला आमची पोहोच वाढवता येईल. फर्न ब्रँड्सना मॅरियट बोनव्हॉय लॉयल्टी प्रोग्राम आणि जागतिक वितरण सिस्‍टम्‍ससोबत धोरणात्मक वाढीच्या संधींमधून देखील फायदा होईल, अशी अपेक्षा आहे,'' असे सीजी कॉर्प ग्‍लोबलचे अध्‍यक्ष डॉ. विनोद चौधरी म्‍हणाले.

''भारतातील मध्यमवर्गीय क्षेत्रात विकासाच्या नवीन युगाला सुरुवात करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या आदरातिथ्‍य कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांची व्‍यापक क्षमता तसेच संस्कृती, वारसा आणि संधींनी समृद्ध असलेल्या भारतातील कमी ज्ञात स्थळांची माहिती मिळवण्‍याचा आमचा दृष्टिकोन आहे. या धोरणात्‍मक सहयोगामधून दर्जेदार आदरातिथ्‍याची उपलब्धता वाढवणे, स्थानिक अर्थव्यवस्थांना चालना देणे आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये शाश्‍वत, आरामदायी व सहजसाध्य निवासांसाठी वाढत्या मागणीची पूर्तता करणे याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते,'' असे कॉन्‍सेप्‍ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्‍हेट लिमिटेडचे अध्‍यक्ष परम कन्‍नामपिल्‍ली म्‍हणाले.

हॉटेल्‍सची सिरीज: प्रादेशिक स्‍तरावर निर्मिती, जागतिक स्‍तरावर कनेक्‍टेड

सिरीज बाय मॅरियट पर्यटकांना साधा व सहज अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, जेथे पायाभूत सुविधा आणि उत्तमरित्‍या अंमलबजावणी केलेल्‍या मुलभूत गोष्‍टींवर लक्ष केंद्रित आहे. पोर्टफोलिओमधील हॉटेल्‍स स्‍वच्‍छ, आरामदायी रूम्‍स, मोफत वाय-फाय, दररोज कॉफी किंवा चहा, ब्रेकफास्‍ट, फिटनेस सेंटर्स आणि विशिष्‍ट मालमत्तांमध्‍ये उपलब्ध असलेल्‍या मीटिंग्‍ज व इव्‍हेण्‍ट स्‍पेसेससह दर्जा व मूल्‍य देतील. हॉटेल्‍समधून प्रांत आणि ते सेवा देणारे ग्राहक दिसून येतील, तसेच सुरक्षितता व स्‍वच्‍छतेप्रती मॅरियटचे जागतिक मानक दिसण्‍यात येतील. मॅरियट बोनव्‍हॉय लॉयल्‍टी प्रोग्रामचा भाग म्‍हणून सिरीज बाय मॅरियट मालमत्तेमध्‍ये राहणाऱ्या सदस्‍य पॉइण्‍ट्स मिळवण्‍यासोबत रिडिम करू शकतील आणि सदस्‍य फायद्यांचा आनंद घेऊ शकतील.

मालकांसाठी जागतिक विकास संधी

सिरीज बाय मॅरियट उद्योग अग्रणी महसूल निर्मिती क्षमता आणि संलग्‍नता खर्च रचनांसह प्रबळ, प्रादेशिकरित्‍या संबंधित ब्रँड्स व हॉटेल्‍सना मॅरियट पोर्टफोलिओमध्‍ये आणण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. मालकांना त्‍यांच्‍या पोर्टफोलिओची स्‍वतंत्र ओळख कायम ठेवण्‍याची सुविधा असेल, तसेच जागतिक स्‍तरावर असलेल्‍या जवळपास २३७ दशलक्ष सदस्‍यांसह मॅरियटच्‍या पुरस्‍कार-प्राप्‍त मॅरियट बोनव्‍हॉय लॉयल्‍टी प्रोग्रामच्‍या क्षमतेचा फायदा घेता येईल. याव्‍यतिरिक्‍त प्रत्‍यक्ष बुकिंग्‍जसाठी Marriott.com आणि मॅरियट बोनव्‍हॉय मोबाइल अॅप सारखे डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍स आहेत.

सीएचपीएलसोबतच्‍या संस्‍थापकीय कराराव्‍यतिरिक्‍त मॅरियट युनायटेड स्‍टेट्स, कॅरिबियन व लॅटिन अमेरिका, युरोप, मिडल ईस्‍ट आणि आफ्रिका येथील मालकांसोबत सिरीज बाय मॅरियट ब्रॅडबाबत सक्रिय चर्चा देखील करत आहे.