Photo Credit: Facebook

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी आपआपल्या परीने तयारीही सुरु केली आहे. पुढील वर्ष आपले चांगले जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाला वाटत असेल की असे काय करावे की त्यांचे संपूर्ण वर्ष सुख, शांती आणि समृद्धीचे जावो. खरे तर प्रत्येक देशात नवीन वर्ष पारंपारिक पद्धतीने आपापल्या शैलीत साजरे केले जाते. त्यामुळे तुम्ही नवीन वर्ष कसे साजरे करता ते तुम्ही जगाच्या कोणत्या भागात राहता यावर अवलंबून आहे. या परंपरांमध्ये अन्न आणि पेये देखील महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मानले जाते की अशा वस्तूंचे सेवन किंवा वापर केल्याने वर्षभर सुख-समृद्धी नांदते . अशा पदार्थांचे सेवन आपल्या नवीन वर्षासाठी शुभ आणि फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया ते कोणते पदार्थ आहे

Photo Credit: Facebook

दही

इतर कोणत्याही खाद्यपदार्थापेक्षा दह्याचा वापर भारतात जास्त केला जातो. याशिवाय अन्न पचवण्यासाठीही दह्याचा उपयोग होतो. दही हे भारतात शुभ प्रतीक देखील मानले जाते. हिंदू घरांमध्ये नवीन किंवा शुभ कार्यासाठी आणि काही शुभ कार्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी साखर-दही खाण्याची जुनी परंपरा आहे. असे केल्याने यशाची शक्यता वाढते असे मानले जाते.

केक

आज केक हे प्रत्येक सणाचे महत्त्वाचे प्रतीक बनले आहे. हे केक एकतर बेक करून घरी बनवले जातात किंवा बाजारातून रेडीमेड मागवले जातात. असे मानले जाते की नवीन वर्षात केक खाल्ल्याने वर्षभर घरात सौभाग्य आणि समृद्धी येते.

हिरव्या पालेभाज्या

पालक, कोबी आणि सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. यासोबतच या सर्व गोष्टी धन आणि पवित्रतेचे प्रतीक मानल्या जातात. म्हणूनच असे मानले जाते की या गोष्टी जीवनात चांगले नशीब घेऊन येतात.

दुग्ध उत्पादने

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, शुद्ध तूप आणि दूध यासारखे दुग्धजन्य पदार्थ सर्वात शुद्ध मानले जातात, म्हणूनच ते समृद्धी, ऐश्वर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले जातात.नवीन वर्षाच्या सुरवातीला याचे सेवन केल्यास वर्षभर ऐश्वर्या नांदते असे म्हणतात.

संत्रा आणि कीनू {टेंजेरिन}

संत्रा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत असतात परंतु चिनी परंपरेनुसार, अशी पिवळी आणि रसाळ फळे खूप भाग्यवान असतात . त्याचप्रमाणे, टेंगेरिन देखील नशीब आणि समृद्धीचे प्रतीक चिनी संस्कृतीमध्ये मानले जाते.