नोव्हेंबर 2018 : या महिन्यात साजरे होत आहेत अनेक सण आणि उत्सव, पाहा पूर्ण यादी
नोव्हेंबरमधील सण (Photo Credits; WikiCommons/ Facebook)

गुलाबी गारव्यासोबत याच महिन्यापासून थंडीला सुरुवात होते. दिवाळी हा हिवाळ्यातील सर्वात मोठा सण. याचसोबत या नोव्हेंबर महिन्यात इतर अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात. हिंदू पंचांगानुसार सध्या कार्तिक महिना चालू आहे. या महिन्यात धनत्रयोदशी, दिवाळी, लक्ष्मीपूजा, भाऊबीज, छट पूजा, तुलसी विवाह यांसारखे अनेक मोठे पर्व साजरे होतात.

भारता हा वैविध्यपूर्ण देश आहे. अनेक जाती धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात, आपले सण उत्सव साजरे करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. कारण भारतातील सणच लोकांना एकत्र घेऊन येतात. सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे. त्यामुळे आज आम्ही या महिन्यात साजरे होणाऱ्या सणांची, उत्सवाची संपूर्ण यादी देत आहोत. या तारखेनुसार तुम्ही हे सण आपला परिवार, मित्रमंडळी यांसोबत साजरा करून तुमचा आनंद द्विगुणीत करू शकता.

नोव्हेंबर महिन्यातील सण आणि उत्सव -

3 नोव्हेंबर 2018- (शनिवार)- रमा एकदशी

4 नोव्हेंबर 2018- (रविवार)- वैष्णव रमा एकादशी, गोवत्स द्वादशी

5 नोव्हेंबर 2018- (सोमवार)- धनत्रयोदशी, प्रदोष व्रत (कृष्ण), यम दीपम, काली चौदस, हनुमान पूजा

6 नोव्हेंबर 2018- (मंगळवार)- नरकचतुर्दशी, काली पूजा

7 नोव्हेंबर 2018- (बुधवार)- दिवाळी लक्ष्मीपूजन, कार्तिक अमावस्या

8 नोव्हेंबर 2018- (गुरुवार)- गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा

9 नोव्हेंबर 2018- (शुक्रवार)- भाऊबीज, यमद्वितीया

12 नोव्हेंबर 2018- (सोमवार)- लाभपंचमी, पांडव पंचमी

13 नोव्हेंबर 2018- (मंगळवार)- छठ पूजा

14 नोव्हेंबर 2018- (बुधवार)- नेहरू जयंती

16 नोव्हेंबर 2018- (शुक्रवार)- वृश्चिक संक्रांती, गोपाष्टमी

17 नोव्हेंबर 2018- (शनिवार)- अक्षय नवमी, जगद्धात्री पूजा

18 नोव्हेंबर 2018- (रविवार)- कंस वध

19 नोव्हेंबर 2018- (सोमवार)- देवुत्थान एकादशी, भीष्म पंचक प्रारंभ

20 नोव्हेंबर 2018- (मंगळवार)- प्रदोष व्रत (शुक्ल), तुळशी विवाह

21 नोव्हेंबर 2018- (बुधवार)- वैकुंठ चतुर्दशी, मिलाद उन-नबी, ईद-ए-मिलाद

22 नोव्हेंबर 2018- (गुरुवार)- मणिकर्णिका स्नान, देव दिवाळी

23 नोव्हेंबर 2018- (शुक्रवार))- कार्तिक पौर्णिमा, पुष्कर स्नान, गुरु नानक जयंती, भीष्म पंचक समाप्त

26 नोव्हेंबर 2018- (सोमवार)- संकष्टी चतुर्थी

29 नोव्हेंबर 2018- (गुरुवार)- कालभैरव जयंती.