Janmashtami 2022: जन्माष्टमीच्या मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णांच्या आवडत्या गोड पदार्थांचा करा विशेष बेत
मिठाई (Photo Credits: Wikimedia Commons)

भगवान श्रीकृष्णाचे (Bhagwan Shree Krishna) दूध (Milk) आणि दुग्धजन्य पदार्थांवरील विशेष प्रेम होते. श्रीकृष्णाला प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या घरी देखील या वर्षी जन्माष्टमी (Janmashtami) निमित्त अशा दुग्धजन्य गोड पदार्थांचा बेत आखू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही विशेष गोड पदार्थ सुचवणार आहोत. जे भगवान श्रीकृष्णांना आणि तुमच्या कुटुंबियांना नक्कीचं आवडतील. पंचामृत (Panchamrit), माखन खीर (Makhan Kheer) , रव्याचे लाडू (Rava Ladoo) आणि अशा बऱ्याच झटपट आणि स्वादिष्ट पदार्थांची विशेष रिसीपी आम्ही तुम्हाला देणार आहोत. तरी या जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला प्रसाद म्हणून ही पदार्थ तुम्ही नक्की करुन बघा. (हे ही वाचा:-Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनसाठी खास मेजवाणी; करा शाही पुलाव, केसरी खीर सारख्या स्वादिष्ट पदार्थांचा बेत)

 

1. पंजीरी

पंजीरी हा पदार्थ जन्माष्टमीचा प्रसाद म्हणून उत्तर भारतात बनवतात. हे बनवण्यासाठी साजूक तूप,दही, दूध,तूप आणि साखर इत्यादींचा समावेश असतो.

 

2. माखन खीर

माखन खीर ही भगवान श्रीकृष्णांच्या आवडत्या पदार्थापैकी एक असल्याची आख्ययीका आहे. तुमच्या घरातील लहानग्यांना हा पदार्थ नक्कीच आवडेल.

 

3. माखन मिश्री

माखन मिश्री बनवण्यासाठी प्रामुख्याने लोणी असणं गरजेचं आहे, माखन मिश्री अगदी झटपट आणि साध्या पध्दतीने बनवता येतं.

 

4. रवा लाडू

रवा लाडू तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या प्रसादासाठी बनवू शकतात. तसेच घरी येणाऱ्या पाहूण्यांना तुम्ही देवू शकता. रव्याचे लाडू आठवडा भर तरी टिकतात म्हणून हा पदार्थ बनवणं अधिक फायद्याचं ठरतं.

 

5. राजगिऱ्याचा शिरा

राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी प्रमुख्याने राजगिरापीठ आणि साखर असणं गरजेचं असतं. तरी प्रसादासह जेवण झाल्यावर गोड पदार्थ म्हणूनही तुम्ही हा पदार्थ पाहूण्यांना सर्व करु शकता.

 

6. पंचामृत

जन्माष्टमीच्या पुजेत पंचामृताचा प्रमुख्याने समावेश असतो.