Zika Virus: देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती अद्याप कायम आहे अशातच आता जीका व्हायरसमुळे नागरिकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण गुरुवारी जीका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हे वर्षातील पहिलेच जीका व्हायरसचे प्रकरण आहे. तिरुवनंतपुरम जिल्ह्यात राहणाऱ्या एका गर्भवती महिल्याचा रक्ताच्या सॅम्पलमध्ये जीका व्हायरसची अधिकृत पुष्टी झाली आहे. महिला 28 जून रोजी खासगी रुग्णालयात ताप, डोके-अंग दुखी आणि शरीरावर येणारे वळ याची लक्षणे दिसून येत असल्याने उपचारासाठी दाखल झाली होती. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, महिलेची प्रकृती स्थिर आहे. तिने 7 जूनला मुलाला जन्म सुद्धा दिला होता आणि ते ही पूर्णपणे उत्तम आहे.
राज्यात 13 जणांना जीका व्हायरसची लागण झाल्याचा संशय असल्याने त्यांचे सॅम्पल पुण्यातील नॅशनल इंस्टिट्युट ऑफ वायरोलॉजी मध्ये पाठवण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जीका व्हायरस हा मच्छर चावल्याने होतो. पहिलांदाच हा व्हायरस भारतात मिळाला नसून कोरोनाच्या काळात याची वाढ होणे म्हणजे चिंतेत भर टाकण्यासारखे आहे.(New COVID-19 Variant Lambda चा जगात 30 देशांमध्ये शिरकाव; जाणून घ्या त्याच्या प्रसारापासून कोवीड 19 लसी विरूद्ध किती शक्तीशाली असल्याच्या दाव्यांबाबत सारे काही!)
>>कसा पसरतो जीका व्हायरस?
जीका एडीज एजीष्ट मच्छरांच्या माध्यमातून पसरतो. जे डेंग्यू आणि चिकनगुनियाचे वाहक आहेत. हे मच्छर साठलेल्या पाण्यात आपली अंडी घालण्यासह तेथेच अधिक दिसून येतात. एडीज मच्छर खासकरुन सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळी नागरिकांना चावतात. व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे, मच्छरांच्या संख्येत वाढ होऊ न देणे. तुमच्या आजूबाजूला मच्छर असतील तर त्यांनी जर तुमचा चावा घेतल्यास त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
>>गर्भवती महिलांनी यापासून बचाव करावा
जीका व्हायरस गर्भवती महिलांना झाल्यास त्याचा धोका बाळाला संभवतो. ऐवढेच नव्हे तर बाळाच्या डोक्यावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. हा व्हायरस गर्भपात आणि मृत बाळाच्या जन्माचे सुद्धा कारण ठरु शकतो.
>>लक्षणं
जीका व्हायरमध्ये व्यक्तीला ताप येणे, अंगावर चट्टे येणे आणि अंग-डोके दुखणे अशा समस्या जाणवतात. ही लक्षणे डेंगू प्रमाणेच असतात. जीका व्हायरसची काही वेळेस लक्षण दिसून येत नाहीत. पण काहींना खोकला, पेशी दुखणे, डोके दुखणे आणि अस्वस्थ वाटणे अशा समस्या होऊ शकतात. ही लक्षणे खासकरुन 2-7 दिवस राहू शकतात.
>>'या' पद्धतीने करा बचाव
-घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका.
-पावसाळ्यात पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घाला.
-झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
-अतिजोखमीच्या ठिकाणी जाणे टाळा.
-गर्भवती महिलांनी खासकरुन काळजी घ्यावी.
सध्या जीका व्हायरस पासून बचाव करण्यासाठी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही आहे. मात्र स्वत:ची काळजी घेणे हा एकमेव उपाय सध्या यावर आहे. कोणतीही लक्षणे या संदर्भात दिसून आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.