COVID-22 म्हणजे काय? जाणून घ्या याच्या उत्पत्तीसह गैरसमजांबद्दल अधिक
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस आणि त्याचा बदलत्या स्वरुपाने सर्वांची झोपच उडवली आहे. अशातच आता कोविड-22 येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेतज्ञांच्या मते, कोविड-19 पेक्षा अधिक वेगाने पसरणारा कोरोना व्हायरसचा सुपर वेरियंट सुद्धा लोकांमध्ये तुफान गतीने वाढू शकतो. कोविड-22 वेरियंट हा पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता आहे. लसीकरणाशिवाय कोणताही संक्रमित व्यक्ती हा वेरियंट वेगाने पसरवू शकतो.(Corona Vaccination: आता WhatsApp वर बुक करू शकता कोरोना विषाणू लसीचा स्लॉट, अशी करता येईल नोंदणी)

विशेतज्ञांच्या मते, लसीकरणाशिवाय सर्व व्यक्ती या संभावित सुपर स्प्रेडर आहेत. सुपर स्प्रेडर म्हणजे जो व्यक्ती संक्रमित आहे त्याच्यापासून अधिक लोकांना त्याची लागण होणे. अशाप्रकारचा सुपर स्प्रेडर कमीतकमी 10 लोकांना संक्रमित करु शकतो. सुपर स्प्रेडर अधिकांश ट्रांन्समिशनचे नवी साखळी सुरु करतात. त्याचसोबत कम्युनिटी ट्रांन्समिशन ही निर्माण करण्यासह तो पुढील टप्पा सुरु करतो.

ज्युरिख मध्ये एक इम्युनोलॉजिस्ट प्रोफेसर साई रेड्डी यांनी असे म्हटले की, सध्याच्या स्ट्रेनच्या मिश्रणाचे परिणाम स्वरुप येणाऱ्या काळात एक नवी आणि अधिक भयंकर महारोग येण्याची शक्यता आहे. तसेच कोविड-19 पेक्षा तो अधिक धोकादायक ठरु शकतो. पुढील काही वर्षात या आजारापासून बचाव करण्यासाठी एकाहून अधिक लसीकरण करण्याची गरज भासणार आहे. तसेच पुढे त्यांनी असे म्हटले की, हा डेल्टाचा प्रसार ऐवढा अधिक आहे की, लसीकरणाशिवाय वेरियंटमुळे संक्रमित प्रत्येक व्यक्ती सुपर स्प्रेडर असू शकतो. त्यांचे असे म्हणणे आहे की, डेल्टाच्या कारणास्ताव आता हा कोविड-19 नाही आहे.(Delta Plus Variant Update: महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ, राज्यात रुग्णांचा आकडा पोहोचला 76 वर)

पुढे असे ही म्हटले की, जवळजवळ अशी शक्यता आहे हा नवा वेरियंट येणार आहे. त्यामुळे आपण फक्त लसीकरणावर विश्वास ठेवू शकत नाही. यासाठी काही वर्षांमध्ये एकाहून अधिक लसीकरणासाठी तयार रहावे लागणार आहे. त्यांनी असे ही म्हटले की, बीटा आणि गॅमा वेरियंट्स बहुतांश करुन अँटिबॉडीजला डावळू शकतात. तर डेल्टा वेरियंट अधिक संक्रमक आहे. येत्या काळात कोरोना कशा प्रकारचा धोकादायक असू शकतो याचा अंदाज येणार आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क रहावे लागणार आहे.