जिरा राईस,जिऱ्याच्या फोडणींचं वरण,सूप,रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक गोष्टींमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो.पण जिरं हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून याचे इतरही अनेक फायदे आहेत. आज जाणून घेऊयात जीरे पाणी पिण्याचे काय फायदे होऊ शकतात.जिरा राईस, जिऱ्याच्या फोडणींचं वरण, सूप, रायतं किंवा जिऱ्याचं पाणी अशा अनेक गोष्टींमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो.पण जिरं हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून याचे इतरही अनेक फायदे आहेत.जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात.तसेच जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.आज जाणून घेऊयात जीरे पाणी पिण्याचे काय फायदे होऊ शकतात.आणि जिऱ्याचे पाणी कसे बनवावे ते ही जाणून घेऊयात. (Health Tips: भरपूर प्रमाणात 'सी' व्हिटामिन असलेले ड्रॅगनफ्रूट खाल्ल्याने 'या' आजारांपासून राहाल दूर)

जीरे पाणी पिण्याचे काय फायदे

जिऱ्याचे पाणी पिल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होते

ताप असल्यास जिऱ्याचे पाणी प्यावे त्याने शरीरात गारवा निर्माण होतो आणि आराम मिळतो

जिऱ्याचे पाणी रोज सकाळी प्यायल्याने Acidity ची समस्या होत नाही

जिऱ्याचे पाणी बॉडी डिटॉक्स करते त्यामुळे स्किन च्या समस्या होत नाही

वजन कमी करण्यासाठी सुद्धा जिऱ्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो

जिऱ्याचे पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये रहाते

जिऱ्याचे पाणी पिल्याने शरीरातील ग्लूकोज ची पातळी लेवल मध्ये रहाते त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो  ( Weight Loss Tips: रोज सकाळी रिकाम्यापोटी प्या गरम लिंबू पाणी आणि महिन्याभरात आणा तुमच्या वाढणा-या वजनावर नियंत्रण)

जिऱ्याचे पाणी कसे करावे

रात्रीच्या वेळी 2 चमचे जिरं 1 ग्लास पाण्यात भिजवावं आणि सकाळी उठल्यावर उकळून गाळून घ्यावं. हे पाणी रिकाम्या पोटी चहासारखं गरमगरम घेतल्यास फायदा होतो. पाणी गाळून उरलेलं जिरं चावून खावं.याचं सेवन रोज केल्यास शरीरातील कोणत्याही भागातील अनावश्यक चरबी शरीरातून बाहेर पडेल. शक्यतो जिरं हे तांब्याच्या भांड्यात भिजवावं. कारण असं मानलं जातं की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायलानेही वजन कमी होतं.