स्किनसाठी फायदेशीर Red Wine, चेहऱ्यावर 'या' पद्धतीने करा उपयोग
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्यः फेसबुक)

सर्वांना माहिती आहे की, रेड वाईन (Red Wine) प्यायल्याने मूड चांगला राहून ताणतणापासून थोडा वेळ दूर राहण्यास मदत होते. तसेच हृदयाशी निगडीत संबंधासोबत आरोग्याच्या इतर समस्याही रेड वाईन प्यायल्याने दूर होतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, रेड वाईनचे ब्यूटी प्रोडक्समध्ये किती महत्व आहे. स्किनवर वाईनचा उपयोग केल्यास त्वचा नितळ आणि कोमल झालेली दिसून येते.

रेड वाईन द्राक्षांपासून बनविली जाते ज्यामध्ये रेवराट्रोल नावाचे ऐंटी-ऑक्सिडेंट हा गुण प्रामुख्याने आढळून येतो. तसेच रेड वाईन सोबत मुल्तानी माती, कोरफड आणि फेस पॅकचा उपयोग करुन चेहऱ्यासाठी उपयोग करु शकता. तसेच क्लिनजर म्हणूनही याचा आपण उपयोग करु शकतो.

-रेड वाईनने फेशियल केल्याचे फायदे

रेड वाईनमध्ये खूप ऐंटीऑक्सिडेंट गुण असल्याने ते त्वचेला चमकादार आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे चेहऱ्यावर रेड वाईनने फेशियल करण्याचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढले आहे.

-वाढते वय लपते

वाढत्या वयानुसार शरीराची त्वचा अधिकाधिक कमकुमवत आणि पातळ होताना दिसून येते. परंतु रेड वाईनमुळे वाढत्या वयाची लक्ष कमी दिसून येतात. तसेच चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्याही दूर होण्यास मदत होते.

-चेहऱ्यावरील पिंपल्स-काळे डाग दूर होतात

चेहऱ्यावर रेड वाईनने फेशियल केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग दूर होतात. तसेच पुन्हा चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळे डाग येण्याची शक्यता कमी होते.

-स्किनवरील टॅनपणा कमी होतो

तुमचा चेहरा जर टॅन दिसत असेल तर तुम्ही रेड वाईनने फेशियल केल्यास उत्तम. तसेच अल्कोहोल त्वचेवरील साचलेल्या धुळीला साफ करण्यास मदत करतात.

-मृत स्किन दूर होते

तुम्ही रेड वाईन आणि द्राक्षांच्या सालींचे मिश्रण करुन चेहऱ्याला लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत स्किन दूर होण्याची शक्यता अधिक असते.