WHO Warn: जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम (Dr. Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी संपूर्ण जगाला इशारा दिला आहे. येत्या काही दिवसात कोरोना व्हायरसपेक्षा भयंकर महामारी (Pandemic) येणार असल्याचं टेड्रोस यांनी सांगितलं आहे. जगाने कोविडपेक्षाही प्राणघातक विषाणूसाठी तयार राहावे. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, WHO प्रमुखांनी सांगितले की, या व्हायरसमुळे किमान 2 कोटी लोकांचा मृत्यू होईल.
डब्ल्यूएचओ प्रमुखांनी जिनिव्हा येथील वार्षिक आरोग्य परिषदेत सांगितले की, आता येणारी महामारी थांबवण्याची वेळ आली आहे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या जागतिक आरोग्य परिषदेच्या बैठकीत WHO प्रमुखांनी इशारा दिला की कोविड-19 महामारी अजून संपलेली नाही. (हेही वाचा - Robotic Surgery: चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात करण्यात आली देशातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया; महिलेच्या मानेतील गाठ काढण्यात डॉक्टरांना यश)
डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, कोविडनंतर आणखी एका प्रकारच्या आजाराचा धोका असू शकतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. ही महामारी कोविडपेक्षाही घातक ठरू शकते. तसेच या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना जीव गमवावा लागेल. यासाठी जगाने तयार राहावे, असं आवाहन केलं आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्यास आम्ही बांधील आहोत, असंही डॉ. टेड्रोस यांना सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने नऊ प्राथमिक आजार ओळखले आहेत. जे सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. डेली मेलने नोंदवले आहे की, उपचारांच्या अभावामुळे किंवा त्यांच्या साथीच्या रोगास कारणीभूत होण्याच्या संभाव्यतेमुळे ते सर्वात धोकादायक मानले गेले. शतकातील सर्वात गंभीर आरोग्य संकट म्हणून समोर आलेल्या कोविड-19 महामारीच्या आगमनासाठी जग तयार नव्हते.
गेल्या तीन वर्षांत कोविड-19 ने संपूर्ण जग बदलून टाकले आहे. यामध्ये सुमारे 70 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु, ही आकडेवारी यापेक्षा जास्त असू शकते, जी सुमारे 20 दशलक्ष असेल, असंही WHO प्रमुखांनी बैठकीत सांगितलं. जे बदल व्हायला हवेत ते आम्ही केले नाहीत तर कोण करणार? आम्ही या महामारीला उत्तर देण्यासाठी तयार आहोत, असंही डॉ. टेड्रोस यांनी सांगितलं आहे.