Monkeypox In India: सावधान! देशात मंकीपॉक्सचा शिरकाव, राजधानी दिल्लीत आढळला पहिला रुग्ण
Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

जागतिक आरोग्य संघटनेकडून मंकीपॉक्सबाबत (Monkeypox) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंकीपॉक्स संदर्भात WHO ने  कालचं जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे. यासंदर्भात डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ टेड्रोस (Dr Tedros Adhanom) यांनी पत्रकार परिषद घेतली. डॉ. टेड्रोस म्हणाले मंकीपॉक्सचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर चिंतेची बाब आहे. जगभरात हा आजार झपाट्यानं पसरत आहे. जगातील 20 हून अधिक देशांमध्ये या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्सच्या सुमारे 200 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 100 हून अधिक रुग्ण संशयित असले तरी अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे.

 

देशाची राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असुन दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतील  31 वर्षीय इसमाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाला मौलाना आझाद मेडिकल कॉलेज (Maulana Azad Medical College) आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णावर डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु आहेत. मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाने आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel) केल्याची कोणतीही माहिती नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. (हे ही वाचा:-Monkeypox संदर्भात WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित)

 

अमेरिका (America), ब्रिटन (Britain), बेल्जियम (Belgium), फ्रान्स (France), जर्मनी (Germany), इटली (Italy), नेदरलँड्स (Netherland), पोर्तुगाल (Portugal), स्पेन (spain), स्वीडन (Sweden), ऑस्ट्रेलिया (Australia), कॅनडा (Canda),  इस्रायल (Israel) आणि स्वित्झर्लंडसह (Switzerland) काही देशांमध्येही मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेने मंकीपॉक्सच्या 9 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  युरोपियन युनियनमध्ये मंकीपॉक्सच्या 118 रुग्ण तर युनायटेड किंग्डम येथे 90 रुग्णांची नोंद केली आहे. भारतात आज पहिला रुग्ण सापडला असला तरी लोकसंख्येच्या दृष्टीने आणि कोरोना महामारीच्या पार्श्वभुमिवर प्रशासनासह नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.