COVID-19 Vaccine Update: जापनीज फार्मा कंपनी Mitsubishi Tanabe लवकरच लॉन्च करणार वनस्पतीवर आधारित कोविड-19 लस
COVID-19 Vaccine (Photo Credits: IANS)

जापनीज फार्मा ग्रुपची Mitsubishi Tanabe Pharma ही कंपनी जगातील सर्वात पहिली झाडांपासून बनवलेली कोविड-19 लस लॉन्च करणार आहे. ही लस स्टोअर करण्यास आणि ट्रान्सपोर्ट करण्यास इतर लसींपेक्षा अधिक सोयीचे आहे, अशी माहिती एका मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. फायनान्स टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, ओसाकामध्ये स्थित असलेल्या मेडिकागो (Medicago) या कंपनीमधून ही लस बनवली जाणार आहे. टोबाको वनस्पतीच्या एका झाडापासून ही लस निर्माण केली जाणार आहे. डिसेंबर 2021 पर्यंत या लसीचे उत्पादन होणे अपेक्षित आहे.

या लसीमध्ये व्हायरस सारखे छोटे पार्टीकल्स असून ते कोरोनाच्या व्हायरसला नष्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे ही लस माणसांसाठी सुरक्षित आहे. ही लस बाजारात आणून फायझर, मॉडर्ना आणि अॅस्ट्रेझेन्का यांसारख्या मोठ्या लस उत्पादक कंपन्यांना ही जापनीज कंपनी टक्कर देऊ शकते.

कोरोनाचा संसर्ग होणे हे साधारण नाही. त्यामुळे लोकांना कोरोना विरुद्धच्या लसीची गरज यापुढे देखील वारंवार लागत राहील. तसेच या रोगाच्या नष्ट होण्याबाबत अजूनही निश्चित असे काही सांगता येत नाही. त्यामुळे लसींची गरज वारंवार लागणारच आहे, असे Mitsubishi कंपनीचे व्हॅसिन डेव्हलपमेंट हेड Toshifumi Tada यांनी दिली. (COVID19 Vaccine च्या दुसऱ्या डोसवेळी वेगळीच लस दिल्यास काय होईल? आरोग्य मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण)

सध्या बाजारात असलेल्या लसींचे उत्पादन करण्यास सुमारे 8-12 महिने लागतात. परंतु, Medicago उत्पादन करण्यास अगदी 5-8 आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे या लसींचे प्रॉडक्टशन रेट इतर लसींपेक्षा खूप जास्त आहे. तसेच ही लस वनस्पतीवर आधारित असल्यामुळे या लसीला ट्रान्सपोर्ट दरम्यान डीप फ्रिज करण्याची गरज लागत नाही. वनस्पतीवर आधारित ही लस अगदी 2 ते 8 डीग्री सेल्सियस मध्येही राहू शकते, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.