लहान मुलांमध्ये Self Confidence वाढविण्याठी पालकांसाठी 'या' खास टीप्स
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

आजकाल माणसांच्या आयुष्यात खुप समस्या उद्भवत आहेत. तसेच दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक मुलाच्या पालकाकडून त्याला सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.

मात्र काही वेळेस आत्मविश्वास नसल्याच्या भितीने सुद्धा मुले किंवा मोठी माणसे काही गोष्टी स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. अशा परिस्थित तुम्हाला तुमच्या मुलाचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. तर 'या' काही खास टीप्स नेहमी लक्षात ठेवा.

1.  मुलांची प्रशंसा करा

मुलांना जेव्हा आपल्या पालकांनकडून प्रशंसा केल्यावर त्यांना प्रेरणादायी (Motivate) वाटते. तर काही वेळेस मुल काम करत असेल आणि ते पालकांनी पाहिले तर त्याचे कौतुक केले जाते. मात्र या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या मुलाची प्रशंसा करणे विसरु नका.

2. मुलांना स्वत:च समस्येचे निवारण करु द्या

दैनंदिन जीवनातील किंवा अभ्यासात येणारे अडथळे या सर्वांसारख्या समेस्येवर त्यांची मदत करु नका. मात्र त्यांच्या समस्येबाबत योग्य सल्ला देऊन त्यांना एकदा ती गोष्ट समजवून सांगा. त्यानंतर मुलांना त्यांच्या समस्येचे निवारण करु द्या. त्यामुळे तुमच्या मुलामधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

3. मुलांशी संवाद साधा

पालकांनी त्यांच्या मुलांसोबत मित्र मैत्रिणीचे नाते तयार करायला हवे. त्यामुळे मुलसुद्धा त्यांच्या अडचणी सांगण्यास घाबरत नाही. तसेच या चढाओढीच्या आयुष्यात आपल्या मुलासोबतचे नाते हे फ्रेंडली असणे खूप आवश्यक आहे.

4. मुलांमध्ये प्रेमभावना व्यक्त करा

मुलांमधील संवेदनशीलता काढून टाका. तसेच त्यांना एकमेकांना मदत करण्यास शिकवावे. या चांगल्या सवयींमुळे मुलाच्या अंगी क्रुरपणाची भावना कधी निर्माण होत नाही.

5. योगासने शिकवा

योगा करण्यामुळे मन शांत होते. तर आपले लक्ष अचूक गोष्टींवर कायम टिकून राहते. तसेच योगासने केल्यामुळे आत्मविश्वास वाढण्यासही मदत होते.