कोरोना व्हायरसच्या प्रभावाखाली सध्या संपूर्ण भारत देश आहे. अशा प्रकारची गंभीर परिस्थिती यापूर्वी आपण कोणीच अनुभवलेली नव्हती. त्यातच अनेक प्रकारची माहिती समोर येत असते. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढतो. कोरोना विषाणूची दहशत आता इतकी पसरली आहे की, नेमकी कशाची आणि काय काळजी घ्यावी हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यापूर्वी मांसाहारी पदार्थांच्या सेवनाने कोरोना व्हायरसची लागण होते. असा गैरसमज सर्वसामान्यांमध्ये होता. कालांतराने तो बऱ्याच प्रमाणात दूर झाला. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता धोका काळजी वाढवत आहे. त्यामुळे भाज्या शिजवताना, फळे खाण्यापूर्वी नेमकी कशी काळजी घ्यावी याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.
सुप्रिया सुळे दर दिवशी कोरोना विषाणूंविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि नागरिकांना सतर्क करण्यासाठी आवश्यक माहिती देत असतात. यापूर्वीही कोविड 19 च्या गंभीर संकटात जनजागृती करणारे अनेक ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने इतरवेळी भाजीपाला, फळे धुता त्याचपद्धतीने धुवा. मात्र त्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून घ्या. जर तुम्ही भाज्या, फळे कच्चीच खाणार असाल तर अजून एकदा धुवून घेणे योग्य ठरेल.
सुप्रिया सुळे ट्विट:
भाज्या व फळे खाण्यापुर्वी एकदा धुवून घ्या. हे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे.
फल और सब्जियाँ एक बार जरुर धोएँ.स्वस्थ रहने के लिए यह आवश्यक है.
Wash Fruits and Vegetables before you consume them.#LetsFightCoronaTogether#WarAgainstVirus pic.twitter.com/fl5eRkqgKz
— Supriya Sule (@supriya_sule) May 17, 2020
कोरोना बाधितांचा आकडा राज्यासह देशभरात झपाट्याने वाढत आहे. अशा काळात पॅनिक न होता योग्य माहिती मिळवून गैरसमज दूर करा. आरोग्य यंत्रणा, सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करा. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर मास्क वापरणे, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.