Pregnancy नंतर फिट राहण्यास मदत करतील या '5' गोष्टी, वजन कमी करण्यास येतील कामी
Pregnant women | (Photo Credit: Pixabay)

सर्वसाधारणपणे गरोदरपणात अनेक महिलांचे वजन वाढते. ते वाढणे स्वाभाविकच असते. एक नवा जीव तुमच्या पोटात वाढत असतो. शिवाय महिलांच्या शरीरात हार्मोन्ससह अनेक गोष्टीत बदल होतात. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे वजनही वाढते. या कारणामुळे प्रसूतीनंतर हे वाढलेले वजन कमी कसे करावे असा प्रश्न महिलांना पडलेला असतो. शिवाय वजन कमी करण्याच्या नादात जेवण कमी केले तर तुमचे स्तनपान केलेल्या बाळावर ही त्याचा परिणाम होतो. अशा वेळी काय करावे हे महिलांना सूचत नाही.

त्यामुळे अनेक महिलांना देवाने दिलेली मातृत्वासाठी सुंदर गोष्ट देखील नाकारतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला आज असे 5 महत्त्वाचे पदार्थ सांगणार आहोत, ज्याने तुमचे प्रसूतीनंतर वजन आटोक्यात येऊ शकते. आणि जे पदार्थ खाल्ल्याने तुमच्यावर वा तुमच्या बाळावर कुठलाही विपरित परिणाम होणार नाही.

1) ओवा – पाण्यात ओवा टाकून उकळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. शिवाय चपातीच्या पिठातही ओवा टाकून तुम्ही खाऊ शकता.

2) जिरं –जिऱ्याचं उकळलेलं पाणी प्या किंवा दुधात जिरं पावडर मिसळून प्या. जिऱ्याचं पाणी प्यायल्याने असिडीटीची समस्याही दूर होईल. आई-वडिल होणं सोपं नाही, कसा अनुभवाल तो नऊ महिन्यांचा अद्भूत प्रवास? वाचा सविस्तर

3) मेथी दाणा – एक चमचा मेथीचे दाणे ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवा आणि हे पाणी सकाळी प्या. मेथी दाणे टाकून उकळलेलं पाणी तुम्ही ब्रेकफास्ट किंवा लंचनंतरही पिऊ शकता. प्रेग्नन्सीनंतर उद्भवणारी सांधेदुखीची समस्याही मेथीच्या सेवनाने दूर होते.

4) हळद – शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याव्यतिरिक्त वजन घटवण्यातही हळद फायदेशीर आहे. दूध किंवा पाण्यात मिसळून तुम्ही हळदीचं सेवन करू शकता.

5) बडीशेप – बडीशेप टाकून उकळलेलं पाणी प्या. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर कच्ची बडीशेप चावून खाऊ शकता.

हे सारे गरम मसाल्यातील पदार्थ आहेत. मात्र या मुळे तुमच्या शरीरावर कुठलाही परिणाम न होते तुमचे वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)