Brain-Eating Amoeba (PC - Wikimedia Commons)

Brain-Eating Amoeba Cases In Kerala: केरळ (Kerala) मध्ये अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (Amoebic Meningoencephalitis) चा आणखी एक घटना नोंदवली गेली आहे. हा दूषित पाण्यात आढळणाऱ्या मुक्त-जिवंत अमिबा (Free-Living Amoeba) मुळे होणारा मेंदूचा दुर्मिळ संसर्ग (Brain Infection) आहे. केरळमध्ये अशा प्रकरणांची एकूण संख्या चार झाली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्ण हा 14 वर्षांचा मुलगा असून तो उत्तर केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील पयोली येथील रहिवासी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मे महिन्यापासून राज्यात अशी चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे सर्व रुग्ण अल्पवयीन आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याला 1 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याची प्रकृती सुधारत आहे. शनिवारी रुग्णाला संसर्ग झाल्याचं समजलं. त्यानंतर त्याला परदेशातील औषधांसह उपचार त्वरित देण्यात आले. (हेही वाचा - Brain-Eating Amoeba: मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला केरळमध्ये आणखी एकाचा जीव, 2 महिन्यांत 3 मुलांचा मृत्यू)

दरम्यान, 3 जुलै रोजी राज्यात मुक्त-जिवंत अमीबाची लागण झालेल्या 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी, इतर दोन - मलप्पुरममधील पाच वर्षांची मुलगी आणि कन्नूरमधील एक 13 वर्षांची मुलगी अनुक्रमे 21 मे आणि 25 जून रोजी दुर्मिळ मेंदूच्या संसर्गामुळे मरण पावले होते. (हेही वाचा - Brain-Eating Amoeba: कोरोनानंतर मेंदू खाणारा अमिबामुळे जगभरात भीतीचे वातावर; संसर्गामुळे दक्षिण कोरियात एकाचा मृत्यू, काय आहे या आजाराची लक्षणं? जाणून घ्या)

शुक्रवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बैठक घेऊन पुढील संसर्ग टाळण्यासाठी अस्वच्छ जलकुंभात आंघोळ करू नये, यासह अनेक सूचना देण्यात आल्या. या बैठकीत जलतरण तलावांचे क्लोरीनेशन योग्य प्रकारे करण्यात यावे आणि लहान मुलांनी पाणवठ्यांमध्ये प्रवेश करताना काळजी घ्यावी. कारण त्यांना या आजाराची सर्वाधिक लागण होते. जलकुंभ स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.