सावधान, कधीही एकत्र खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर उद्भवतील अनेक समस्या
(Photo Credits: Youtube)

चांगल्या आणि पोषक आहारामधूनच चांगले आरोग्य घडत असते. आहारामधून शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे मिळाली पाहिजे, असा चौकस आहार हेल्दी लाइफस्टाइलसाठी फारच गरजेचा असतो. अशी वेगवेगळी पोषक तत्वे मिळावी म्हणून काहीवेळा अनेक पदार्थ एकत्रित खाल्ले जातात. तरी खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या कॉम्बिनेशनबाबत आपण नेहमीच गोंधळलेले असतो. मात्र आहारशास्त्रामध्ये असे काही पदार्थ सांगितले आहे ज्यांच्या एकत्र खाल्ल्याने शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. आयुर्वेदामध्येही असे पदार्थ एकत्र खाल्याचे दुष्परिणाम सांगण्यात आलेले आहेत.  चला तर पाहूया असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

दुध आणि केळं – आपल्या जेवणात शिकरण हा प्रकार हमखास समाविष्ट केलेला असतो. मात्र हे दोन पदार्थ एकत्र खाणे हे धोक्याचे आहे, दोन्ही पदार्थ एकमेकांना पचण्यापासून रोखतात. दोन्ही पदार्थांच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने, हे पदार्थ एकत्र खाल्‍यामुळे शरीराची अन्‍न पचण्‍याची प्रक्रीया बदलते त्यामुळे पोटात गॅस, अपचन निर्माण होऊन उलटी होण्याची शक्यता असते.

दुधासोबत दही, मीठ, आंबट पदार्थ अथवा आंबट फळे खाणेदेखील हानिकारक आहे.

टरबूज आणि खरबूज - उन्हाळ्यात मिळणारी ही दोन्ही फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतू ती एकत्र खाल्यास अपचन आणि पोटाच्‍या इतर समस्‍या उद्भवू शकतात.त्‍यामुळे हे पदार्थ सोबत खाणे टाळावे.

ब्रेड आणि नूडल्‍ससोबत ज्‍यूस - ब्रेड आणि नूडल्‍सना एकत्र खाल्‍ल्‍याने ते महत्वाच्या एंझाइमला नष्‍ट करतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात. म्हणून हे एकत्र खाणे आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे.

काकडी आणि टोमॅटो - सॅलेड म्‍हणून अनेकदा काकडी आणि टोमॅटो एकत्रित खाल्ले जातात. मात्र यामुळे पोटांचे आजार होऊ शकतात. हे दोन पदार्थ एकत्रित खाल्ल्यास गॅस, ब्‍लोटिंग, पोटदुखी, थकवा, अस्‍वस्‍थ वाटणे अशा समस्‍या उद्भवू शकतात.

बर्गर आणि कोल्ड्रिंक - बहुतेकवेळा बर्गर आणि कोल्ड्रिंक एकत्र घेतले जाते. बर्गर खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक पिल्यास ते पचनक्रियेस पुरक ठरते, असे सांगितले जाते. मात्र ते चुकीचे आहे. कोल्ड्रिंक पिल्यामुळे पोटात असणारे तेलकट पदार्थ घट्ट पदार्थात बदलले जातात. त्यामुळे त्यांचे पचन होणे अवघड ठरते. तसेच याद्वारे आपली पचनक्रिया खराब होते.