Heart Disease, Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

COVID-19 विषाणू अर्थातच कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणामुळे जगभरात सुरु झालेल्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. साथीच्या या आजारापासून बचाव करण्यासाठी विविध खबरदारी घेण्याचे जागतिक आरोग्य संघटना देशभरातील नागिरिक आणि सरकारांना अवाहन करत आहे. अशात मधुमेह अथवा हृदयविकाराचा आजार (Heart Disease) आहे अशा नागरिकांना विशेष काळजी घेण्यास सांगितले जात आहे. दरम्यान, तज्ज्ञांचा सल्ला मात्र असा की, हृयविकार रुग्णांनी (Heart Patients) कोविड-19 विषाणू अथवा कोरोना व्हायरसला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. योग्य काळजी घ्या आणि निश्चिंत राहा असे या तज्ज्ञांचे मत आहे.

आयएएनएस वृत्तसंस्थेने कार्डियोलॉजिस्ट डॉ. अक्षय प्रधान यांच्याशी संवाद साधला. या वेळी आयएएनएससोबत बोलताना डॉ. प्रधान यांनी सांगितले की, जागतिक महामारीबाबत हृदयविकार रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही. आपली औषधं नियमीत घेत चला. यासोबतच योगा, आवश्यक व्यायाम आणि आहार यावार विशेष भर द्या. कोरोना व्हायरसला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. योग्य काळजी घेऊन अशा रुग्ण अथवा नागरिकांनी निश्चिंत राहिले पाहिजे. यासोबतच सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना, केंद्र, राज्य अथवा स्थानिक आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे. तसेच, सोशल डिस्टेंसिंग प्रामुख्याने पाळायला हवे.

पुढे बोलताना प्रधान यांनी सांगितले की, साखर, रक्तदाब यात कोणताही धोका अथवा रिस्क फॅक्टर नाही. मात्र, हृदयरोगाचा त्रास असलेले रुग्ण कोरोना व्हायरस संक्रमित झाले तर धोका वाढू शकतो. तसेच, आगोदरपेक्षा परिस्थिती अधिक वाईट होऊ शकते. जगभरातील अनेक रुग्णांमध्ये (प्रामुख्याने ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे) असा त्रास आणि परिस्थिती जाणवली आहे. त्यामुळे हृदयरोग असलेल्या रुग्णांनी सामान्य रुग्णांपेक्षा काहीशी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

डॉ. प्रधान यांनी म्हटले आहे की, तनावमुक्त राहण्यासाठी योगा, मेडिटेशन वाढविण्याची आवश्यकता आहे. घरात बसून राहणाऱ्या नागरिकांची कॅलरी वाढत असेल. अशा वेळी आपण आपला आहार बदलायला हवा. घरातच व्यायाम करावा आणि शरीरातील साखर आणि रक्तदाब कसा नियंत्रणात राहील याबाबत विचार करायला हवा. पावले टाकायला हवीत. (हेही वाचा, Coronavirus Symptoms: खोकला, ताप यांसह समोर आली कोरोना विषाणूची नवीन सहा लक्षणे, घ्या जाणून)

कोरोना व्हायरस संक्रमन झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण फारच कमी आहे. अशा प्रकारची घटना किंवा प्रकरणं मोठ्या प्रमाणात अद्याप तरी पुढे आली नाहीत. खास करुन हृदयाच्या रुग्णांबाबत. मात्र असे असले तरी नागरिकांनी आपली काळजी घ्यायला हवी. औषधं प्रामुक्याने वेळेवर घ्यायला हवीत. तसेच, कोणत्याही प्रकारे ताण-तणाव यापासून दूर राहायला हवे. कोरोना व्हायरस संदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गर्शक तत्वांचे पालन हे आपल्याला कोरोनापासून दूर राहण्यासाठी महत्त्वाचे ठरु शकते.

९० वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात ; कोरोनाला हरवून परतले आपल्या घरी - Watch Video

दरम्यान, ताण तणावापासून दूर राहण्यासोबतच प्रोटीनयुक्त आहारावर भर. डाळ, हिरव्या भाज्या, ताजी फळं आदींचा आहारात समावेश. तसेच, भाकरी, चपाती, भात यांचे आहारातील प्रमाण कमी ठेवणे. मीठ, साखर, गोड पदार्थाचे सेवनक कटाक्षाणे टाळणे तसे योग्य व्यायाम, औषधं आणि आहार घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.